कंबोडियातील बॅयान मंदिरात युद्धातील
प्रसंगांची कोरलेली विविध शिल्पे आजही अस्तित्वात !
बॅयान मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात
असलेल्या भिंतींवर खमेर सैनिक (कंबोडिया) आणि चंपा
सैनिक (व्हिएतनाम) यांच्यात झालेल्या युद्धाची दृश्ये कोरलेली असणे
मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात असलेल्या भिंतींवर अनेक शिल्पे आहेत. त्यांत मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे आणि उजवीकडे युद्धाची दृश्ये कोरलेली आहेत. यामध्ये खमेर सैनिक (कंबोडिया) आणि चंपा सैनिक (व्हिएतनाम) यांच्यात झालेल्या युद्धाची दृश्ये (छायाचित्रे क्रमांक १ पहा.) खमेर सैनिकांच्या साहाय्याला आलेले चिनी सैनिक, अशा अनेक दृश्यांचा समावेश आहे. यांमध्ये सैनिकांची युद्धाच्या वेळी असलेली वेशभूषा आश्चर्यकारक आहेे. सैनिकांच्या अंगावर तंत्र-मंत्राने भारित केलेले जाड दोरे बांधल्याचे दिसते. हे दोरे म्हणजे सैनिकांचे संरक्षककवच (चिलखत) होय. देवतांच्या उपासनेने भारित केलेले असे दोरे बांधल्यामुळे सैनिकांचे रक्षण होते, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. यावरून त्या वेळच्या सैनिकांनी प्रत्येक गोष्टीचा किती आध्यात्मिक स्तरावर विचार केलेला असायचा, हे लक्षात येते. (छायाचित्र क्रमांक २ पहा.) मंदिराच्या प्रवेशद्वाराला वासुकी आणि तक्षक या नागांच्या मूर्ती आहेत (छायाचित्र क्रमांक ३ पहा.) आणि काही ठिकाणी विष्णुवाहन गरुडही दिसतो. काही भिंतींवर रामायण आणि महाभारत यांतील काही प्रसंगांचे देखावे असलेली शिल्पेही आढळतात.
– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया
राष्ट्ररक्षणासाठी कंबोडियाच्या तत्कालीन
राजाने त्याच्या सैनिकांना आध्यात्मिक कवच प्रदान करणे; मात्र
ही गोष्ट भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या लक्षात न येणेे, हे लज्जास्पद !
राष्ट्ररक्षणासाठी त्या वेळचे राजे देवतांची उपासना करून स्वतःच्या सैन्याला तंत्र-मंत्रांद्वारे आध्यात्मिक कवच प्रदान करत असत. ते राजे सैन्य आणि राष्ट्र यांची आध्यात्मिकदृष्ट्या काळजी घेत होते, हे यातून दिसून येते. स्वतः राजाने आणि त्याच्यामुळे प्रजेने धर्माचरण केल्यामुळे त्यांचे राज्य, तसेच राज्यातील जनता आनंदी अन् संपन्नतेने नटलेली दिसून येते. सहस्त्रो वर्षांपूर्वीही त्यांचे विचार किती आध्यात्मिक होते आणि त्यांची कृती कशी अध्यात्माला जोडून होती, हे दिसून येते. भारतातील राजकीय नेत्यांना ही गोष्ट निश्चितच शिकण्यासारखी आहे. ईश्वरी अधिष्ठानाविना प्रजा आणि राष्ट्र यांची उन्नती अशक्य आहे, याचे हे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या धर्मविरोधी संघटनांना ही एक मोठी चपराक आहे.
– श्री. दिवाकर आगावणे, कंबोडिया