आध्यात्मिक स्तरावरील आणि मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणार्या विचारांशी निगडित अर्थपूर्ण बाटिक नक्षी असणारी विविध देशांतील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रे !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ‘इंडोनेशियातील लोक विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षी असलेले कपडे वापरतांना दिसतात. याविषयीची माहिती घेतांना लक्षात आले, ‘प्रत्येक प्रकारच्या नक्षीला वेगळा अर्थ आणि वेगळे महत्त्व आहे.’ ‘सत्त्व-रज-तम या त्रिगुणांनुसार सात्त्विक नक्षी कशी असावी ?’, हे जरी तेथील लोकांना ठाऊक नसले, तरी बुद्धीने का होईना; पण त्यांनी मानवी जीवनातील विविध प्रसंगांनुरूप आणि आध्यात्मिक दृष्टीनेही दैवी कृपा प्राप्त होण्याचा विचार लक्षात घेऊन केलेला हा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाचा आणि अभ्यास करण्याजोगा वाटतो. इंडोनेशियाप्रमाणेच मलेशियातही आपल्याला असे वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षीचे कपडे पहायला मिळतात.