‘अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री
फाऊंडेशन’चे प्रवर श्रद्धेय श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांचे गौरवोद्गार

देहली – सनातन संस्थेचे साधक अतिशय मधुरभाषिक असतात. ते न्यूनतम आवश्यकतांमध्ये जगतात आणि राष्ट्र अन् धर्म यांचे अधिकाधिक कार्य करण्याची कामना करतात. कठीण प्रसंगातही स्वत:चे निरीक्षण करणे, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट मी त्यांच्यात पाहिली आहे. त्यांना अतिशय चांगले मार्गदर्शन मिळत आहे. घरोघरी जाऊन धर्मजागृती करण्याचे अतिशय चांगले कार्य सनातन संस्था करत आहे, असे गौरवोद्गार ‘अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि करपात्री फाऊंडेशन’चे प्रवर श्रद्धेय श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी प्रवर श्रद्धेय श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांची देहली येथे नुकतीच भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी ते बोलत होते.
प्रवर श्रद्धेय श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांची उज्जैनमध्ये झालेल्या वर्ष २०१६ च्या सिंहस्थपर्वामध्ये उपस्थिती लाभली होती. त्यावेळी त्यांचा सनातनच्या साधकांशी संपर्क प्रथमच झाला होता.