‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले विश्वकल्याणाकरता सत्त्वगुणी लोकांचे ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष १९८९ पासून त्यांच्या जीवनात बर्याचदा महामृत्यूयोग आले आहेत. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी त्यांचे देहधारी अस्तित्व आवश्यक असल्याने योगतज्ञ दादाजी वैशंपायन (कल्याण, जिल्हा ठाणे), प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी (पुणे) यांसारखे काही संत त्यांना स्वतःहून आध्यात्मिक साहाय्य करत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण होऊन त्यांना धर्मकार्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी त्यांना आध्यात्मिक उपायांसाठी (टीप १ आणि २) एक स्टीलचा संस्कारित डबा दिला. १४.१०.२०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या संस्कारित डब्याचा आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग करणे (डब्याला स्पर्श करून मंत्रपठण करणे) आरंभ केले. त्यांनी या डब्याचा उपायांसाठी उपयोग करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. ‘आध्यात्मिक उपायांमुळे त्या डब्यामध्ये झालेल्या आध्यात्मिक पालटांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
टीप १ – आध्यात्मिक उपाय : एखाद्या विशिष्ट घटकातील सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट होणे आणि सकारात्मक स्पंदनांत वृद्धी होणे, याला ‘आध्यात्मिक उपाय होणे’, असे म्हणतात. आध्यात्मिक त्रास असलेली व्यक्ती साधना करणारी असल्यास तिची संवेदनशीलता वाढलेली असते. त्यामुळे तिला ‘स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत आहेत अथवा नाही ?’, हे जाणवू शकते.
टीप २ – योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितलेले आध्यात्मिक उपाय : योगतज्ञ दादाजींनी सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या संस्कारित डब्याला हस्तस्पर्श करून ‘दत्तमाला मंत्र’ आणि ‘ॐ श्रद्धां मेधां…..’ हा मंत्र हे दोन्ही प्रत्येकी ३ वेळा म्हणावेत. त्यानंतर तो डबा परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीच्या खालील तळमजल्यावरील पूर्वेकडील जागेत भूमीत खड्डा करून ठेवावा. डबा खड्ड्यात ठेवल्यावर त्याची पूजा करावी आणि त्यानंतर तो खड्डा मातीने बुजवावा.’
१. चाचणीचे स्वरूप
१४.१०.२०१७ या दिवशी केलेल्या चाचणीत ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे डब्याच्या संदर्भात पुढीलप्रमाणे मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या.
अ. एक सर्वसाधारण स्टीलचा डबा (आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या संस्कारित डब्याच्या आकाराचा हा डबा तुलनेसाठी घेतला होता.)
आ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेला स्टीलचा संस्कारित डबा
इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संस्कारित डब्याला हस्तस्पर्श करून मंत्रजप केल्यानंतर
ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संस्कारित डब्याचा आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग केल्यानंतर तो भूमीत ४ फूट खोल खड्ड्यात ठेवून त्याची विधीवत् पूजा केल्यानंतर
उ. शेवटी खड्ड्यात माती घालून तो बुजवल्यानंतर तेथील माती या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ इत्यादी नेहमीची सूत्रे goo.gl/Kq3ocC या गूगल लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. स्टीलचा सर्वसाधारण डबा आणि योगतज्ञ
दादाजी वैशंपायन यांनी उपायांसाठी दिलेला स्टीलचा संस्कारित डबा
२ अ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन – स्टीलच्या सर्वसाधारण डब्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असणे, तर योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्यामध्ये ती नसणे
स्टीलच्या सर्वसाधारण डब्याच्या ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जांच्या मापनासाठी केलेल्या मोजणीच्या वेळी ‘यू.टी.एस्.’ स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ या डब्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होत्या आणि त्यांची प्रभावळ डब्यापासून अनुक्रमे ५८ सें.मी. आणि ८० सें.मी. होती. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी उपायांसाठी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्याच्या या दोन नकारात्मक ऊर्जांसाठी केलेल्या मोजणीच्या नोंदीत स्कॅनरच्या भुजा उघडल्या नाहीत. याचा अर्थ या डब्यामध्ये दोन्ही नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हत्या.
२ अ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील केलेल्या मोजणीच्या नोंदीचे विवेचन – स्टीलच्या सर्वसाधारण डब्यामध्ये सकारात्मक ऊर्जा अल्प असणे, तर योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्यामध्ये ती पुष्कळ जास्त असणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. स्टीलच्या सर्वसाधारण डब्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या केलेल्या मोजणीच्या नोंदीत स्कॅनरच्या भुजा १३० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ या डब्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती; परंतु ती अल्प प्रमाणात होती आणि त्या ऊर्जेची प्रभावळ नव्हती. (स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच आपल्याला प्रभावळ मोजता येते.) योगतज्ञ दादाजी यांनी उपायांसाठी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्याची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ डब्यापासून ७२ सें.मी. दूरपर्यंत होती.
२ अ ३. डब्याच्या प्रभावळीच्या संदर्भातील केलेल्या मोजणीच्या नोंदीचे विवेचन – योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्याची प्रभावळ स्टीलच्या सर्वसाधारण डब्याच्या प्रभावळीच्या तुलनेत अधिक असणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. स्टीलच्या सर्वसाधारण डब्याची प्रभावळ ६५ सें.मी. होती, तर योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या डब्याची प्रभावळ ८२ सें.मी. होती, म्हणजे ती स्टीलच्या सर्वसाधारण डब्यापेक्षा १७ सें.मी. अधिक होती.
या सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण सूत्र ‘३ अ’ मध्ये दिले आहे.
२ आ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी उपायांसाठी दिलेला संस्कारित डबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उपायांसाठी वापरण्यापूर्वी, उपायांसाठी वापरल्यानंतर आणि त्यानंतर तो भूमीत खड्डा करून त्यात ठेवून त्याची पूजा केल्यानंतरच्या मोजणीच्या नोंदी
२ आ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन – योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्यामध्ये नकारात्मक ऊर्जा न आढळणेे
योगतज्ञ दादाजी यांनी दिलेला संस्कारित डबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी वापरण्यापूर्वी, आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर आणि तो भूमीत ठेवून त्याची पूजा केल्यानंतर त्या डब्याची नकारात्मक ऊर्जा मोजली, तेव्हा स्कॅनरच्या भुजा उघडल्या नाहीत. याचा अर्थ त्या तिन्ही वेळी डब्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती.
२ आ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन – योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्यामधील सकारात्मक ऊर्जा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तो डबा आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर नाहीशी होणे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या संस्कारित डब्याचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग करण्यापूर्वी डब्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची स्पंदने डब्यापासून ७२ सें.मी. होती. या डब्याचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग केल्यानंतर त्या डब्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. तसेच पुढे तो डबा भूमीतील खड्ड्यात ठेवून त्याची पूजा केल्यानंतरही त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ ३. डब्याच्या प्रभावळीच्या संदर्भातील केलेल्या मोजणीच्या नोंदींचे ववेचन – योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्याची प्रभावळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या डब्याचा आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग केल्यानंतर घटणे आणि पुढे तो डबा भूमीत ठेवून त्याची पूजा केल्यावर ती थोडी वाढणे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्याचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग करण्यापूर्वी त्या डब्याची प्रभावळ ८२ सें.मी. होती. डब्याचा उपायांसाठी उपयोग केल्यानंतर प्रभावळ ५९ सें.मी. झाली. याचा अर्थ ती २३ सें.मी. घटली. त्यानंतर तो डबा भूमीत ठेवून त्याची पूजा केल्यावर डब्याची प्रभावळ ७२ सें.मी. होती. याचा अर्थ पूजेमुळे डब्याची प्रभावळ १३ सें.मी. वाढली.
३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्र
३ अ. स्टील हा असात्त्विक धातू असल्याने स्टीलच्या सर्वसाधारण डब्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असणे, तर योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आध्यात्मिक उपाय होण्यासाठी स्टीलच्या डब्यामध्ये आपल्या विधीद्वारे आवश्यक शक्ती संक्रमित केली असल्याने त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा असणे
‘स्टील’ हा असात्त्विक धातू आहे. त्यामुळे स्टीलच्या सर्वसाधारण डब्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेला डबाही स्टीलचा आहे; परंतु त्यांनी विधीद्वारे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील वाईट शक्तींची आक्रमणे दूर होऊन त्यांना धर्मकार्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे’, यासाठी डब्यामध्ये कार्यानुरूप आवश्यक शक्ती (सकारात्मक ऊर्जा) संक्रमित केली होती. त्यामुळे या डब्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही, तसेच स्टीलच्या सर्वसाधारण डब्याच्या तुलनेत या संस्कारित डब्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि डब्याची स्वतःची प्रभावळ अधिक आढळली.
३ आ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या स्टीलच्या संस्कारित डब्याद्वारे आध्यात्मिक उपाय करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्या डब्यामधील सकारात्मक ऊर्जा मिळाल्यामुळे उपायांनंतर त्या डब्यामध्ये सकारात्मक ऊर्जा न आढळणे आणि डब्याची प्रभावळही घटणेे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर संस्कारित डब्याच्या माध्यमातून आध्यात्मिक उपाय होण्यासाठी त्यांना डब्याला हस्तस्पर्श करून मंत्रजप करायला सांगितले होते. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केल्यावर डब्यामधील शक्ती कार्यरत होऊन प्रक्षेपित होऊ लागली. ही शक्ती आणि चैतन्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मिळाले. थोडक्यात, डब्यामधील सकारात्मक स्पंदने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ग्रहण केल्यामुळे उपायांनंतर केलेल्या मोजणीच्या नोंदीत डब्यामधे सकारात्मक ऊर्जा आढळली नाही, तसेच डब्याची स्वतःची प्रभावळही घटली.
३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संस्कारित डब्याचा आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग केल्यानंतर तो डबा भूमीत खड्ड्यामध्ये ठेवून त्याची पूजा केल्यानंतर त्याची प्रभावळ थोडी वाढण्याचे कारण
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संस्कारित डब्याचा आध्यात्मिक उपायांसाठी उपयोग केल्यानंतर तो डबा भूमीत खड्डा करून ठेवण्यात आला. त्यानंतर त्या डब्याची मंत्रोच्चारात पूजा केल्यामुळे थोडीफार ऊर्जा डब्याला मिळाली. त्यामुळे त्याची प्रभावळ थोडी वाढली; पण त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही.
३ ई. खड्ड्यामध्ये ठेवलेल्या संस्कारित डब्यावर माती घालून तो खड्डा बुजवल्यावर तेथील मातीच्या केलेल्या मोजणीच्या नोंदीत मातीमध्ये नकारात्मक स्पंदने आढळण्याचे कारण
खड्ड्यात ठेवलेल्या संस्कारित डब्याची पूजा केल्यानंतर त्यामधील सकारात्मक शक्ती काही प्रमाणात पाताळाच्या दिशेने वाहून पाताळातील वाईट शक्तींना विरोध करू लागली. त्यामुळे या सकारात्मक शक्तीशी लढण्यासाठी पाताळातील त्रासदायक शक्ती खड्ड्यात येऊ लागली. त्यामुळे संस्कारित डबा भूमीत ठेवून त्यावर माती घातल्यानंतर डब्यावरील मातीच्या केलेल्या मोजणीच्या नोंदीत ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या. तसेच या मातीमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. नकारात्मक ऊर्जेमुळेच त्या मातीची स्वतःची प्रभावळ डब्यापेक्षा अधिक होती. डब्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती.’
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.१०.२०१७)
ई-मेल : [email protected]
२७.१२.२०१७ या दिवशी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आध्यात्मिक उपाय होण्यासाठी प्राप्त झालेला स्टीलचा संस्कारित चपटा डबा उपायांनंतर भूमीत ठेवण्याच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे
‘योगतज्ञ दादाजी यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांसाठी स्टीलचा चपटा डबा संस्कारित करून पाठवला होता. त्यात त्यांनी अनुष्ठान करून दैवी शक्तीने भारित केलेल्या वस्तू ठेवल्या होत्या. योगतज्ञ दादाजी यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना ३ दिवस तो डबा हातात घेऊन त्यांना जमेल तेवढा वेळ ‘महामृत्युंजय मंत्रजप’ करण्यास सांगितले होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी २८ ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत पहिल्या दिवशी १ घंटा, दुसर्या दिवशी २ घंटे आणि तिसर्या दिवशी ३ घंटे मंत्रजप केला. त्यानंतर ३१ डिसेंबर या दिवशी हा डबा परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील भूमीत ठेवायचा होता. त्या संदर्भात मला पुढील सूत्रे परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळाली.
१. ‘खोलीतील कुठली फरशी काढून डबा आत ठेवायचा,
हे सूक्ष्मातून कसे शोधायचे ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवणे
२९.१२.२०१७ या दिवशी मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘खोलीत खड्डा करून डबा कुठे ठेवायचा ?’, हे विचारले. त्यांनी मला सूक्ष्मातून शोधायला सांगितले. मी देवाला प्रार्थना करून एक ठिकाण परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले. मी खोलीचा आराखडा आलेखाच्या कागदावर काढला होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या खोलीच्या आराखड्यातील प्रत्येक चौकोनावरून बोट फिरवले आणि बोटाला जडपणा जाणवतो, म्हणजे त्रासदायक स्पंदने जाणवतात, ते ठिकाण शोधले. (आराखड्यातील प्रत्येक चौकोन म्हणजे खोलीतील एक फरशी होती.) तेथे तो डबा ठेवण्यास मला सांगितले. अशा प्रकारे सूक्ष्मातून स्पंदने शोधण्याची नवीन पद्धत मला परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळाली.
२. आधी काढलेल्या सूक्ष्मातील स्पंदनांवर विसंबून न
रहाता वर्तमान स्थितीला पुन्हा सूक्ष्मातून स्पंदने काढणे आवश्यक असणे
२९.१२.२०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘त्यांच्या खोलीत खड्डा करून कुठे डबा ठेवायचा ?’, हे शोधून मला सांगितले. मी तशी नोंद आलेखाच्या कागदावरील खोलीच्या आराखड्यावर केली. डबा खोलीत खड्डा करून ठेवायच्या दिवशी, म्हणजे ३१.१२.२०१७ या दिनांकाला मला त्यांनी बोलावले आणि ‘आधी सूक्ष्मातून शोधलेल्या ठिकाणी डबा न ठेवता थोडा पुढे ठेवूया’, असे सांगितले, तसेच मलाही सूक्ष्मातील स्पंदनांवरून याची अनुभूती घेण्यास सांगितले. मी खोलीतील फरश्यांवरून थोड्या अंतरावरून बोट फिरवल्यावर मलाही ठिकाण पालटले असल्याचे जाणवले. आज बोट फिरवून सूक्ष्मातील स्पंदने पाहिल्यावर आधी शोधून काढलेल्या ठिकाणापेक्षा परात्पर गुरु डॉक्टरांनी आज सूक्ष्मातून शोधलेल्या नवीन ठिकाणी अधिक त्रासदायक स्पंदने जाणवत होती. यावरून शिकायला मिळाले की, वर्तमानात प्रत्येक गोष्टीत काही ना काही पालट होत असल्याने सूक्ष्मातून आधी एखादे परीक्षण केले असल्यास ‘वर्तमानातही परीक्षण तेच आहे ना ?’, याची निश्चिती करणे आवश्यक असते. सतत वर्तमानात रहाणे आवश्यक आहे.
३. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या संस्कारित डब्यातील शक्तीची स्पंदने त्या आध्यात्मिक उपायांनंतर अल्प होऊन त्या डब्यात आनंदाची स्पंदने जाणवू लागणे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांसाठी डबा संस्कारित करून दिला होता आणि त्यांना ३ दिवस तो डबा हातात घेऊन मंत्रपठण करण्यास सांगितले होते. तो डबा जेव्हा योगतज्ञ दादाजी यांच्याकडून आला, तेव्हा त्यात पुष्कळ शक्ती जाणवत होती आणि तो जडही जाणवत होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी ३ दिवस तो डबा हातात घेऊन मंत्रपठण केल्यानंतर तो डबा मला हातात घेऊन ‘काय जाणवते ?’, हे पहाण्यास सांगितले. आता तो डबा पुष्कळ हलका जाणवत होता. त्यातील शक्तीची स्पंदने पुष्कळशी अल्प होऊन आता त्या डब्यातून आनंदाची स्पंदने जाणवत होती. ‘त्या संस्कारित डब्यातील शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांद्वारे मिळाली’, असे जाणवले.
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.