जामिनावर सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह प्रथमच गोव्यात !
साध्वीजी आपल्या धर्मतेजाने, प्राणांतिक यातनाही नमल्या,
धर्मश्रद्धेचा अन् आत्मबळाचा आदर्श उभा राहिला ।
धर्मद्रोह्यांच्या पापाचा घडा मात्र भरला,
लवकरच भगवंत अवतार घेईल हिंदु राष्ट्र स्थापण्या ।
रामनाथी (गोवा) – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त झालेल्या प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ५ एप्रिल या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. तत्पूर्वी साध्वी प्रज्ञासिंह यांचे येथील दाबोळी विमानतळावर हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी स्वागत केले. त्यानंतर साध्वीजींचे रामनाथी आश्रमात शुभागमन झाल्यावर सौ. आरती पुराणिक यांनी त्यांचे पाद्यपूजन आणि औक्षण केले, तसेच त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी मंत्रपठण केले. या वेळी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती.
क्षणचित्रे
१. साध्वीजींच्या स्वागतासाठी आश्रमाच्या प्रवेशद्वारापासून आश्रमातील साधक पारंपरिक वेशात आणि भगवे ध्वज घेऊन उभे होते, तसेच आश्रमामध्ये पणत्याही लावण्यात आल्या होत्या.
२. साध्वीजींचे आश्रमाच्या आवारात आगमन होताच उपस्थित साधकांनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, असा जयघोष केला.
३. स्वागताच्या वेळी आश्रमातील सुवासिनींनी साध्वीजींच्या चरणांवर पुष्पवृष्टी केली.
४. याप्रसंगी सनातनचे संत पू. सदानंद (बाबा) नाईक, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले थोरले बंधू श्री. अनंत बाळाजी आठवले, तसेच ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
साध्वी प्रज्ञासिंह यांच्या स्वागतासाठी साधकांनी सिद्ध केलेला स्वागतपर काव्यफलक साध्वीजींनी वाचला. त्यानंतर आश्रमाच्या वास्तूत प्रवेश केल्यावर मार्गिकेमध्ये उपस्थित असलेल्या साधकांकडे पाहून साध्वीजींनी उत्स्फूर्तपणे जय हिंदु राष्ट्र, असा जयघोष केला.