कु. अपाला आैंधकर आणि कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकांनी नृत्याच्या वेळी केलेल्या रंगभूषेचा (मेकअपचा) त्यांच्यावर झालेला परिणाम

‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्वूविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘प्राचीन काळापासून नृत्यकला रंगभूषा (मेकअप) करून सादर केली जात आहेे. पूर्वीच्या काळी रंगभूषेत सात्त्विक अलंकार, सात्त्विक पोषाख, सात्त्विक केशरचना, सुगंधी पुष्पे अशा घटकांचा उपयोग केला जात असे. ‘आताची रंगभूषा केल्यामुळे नृत्य करणार्‍यावर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा वापर करण्यात आला. १.९.२०१७ आणि २२.९.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत दोन बालिकांची त्यांनी रंगभूषा करण्यापूर्वी आणि रंगभूषा १ घंटा कालावधीसाठी केल्यानंतर ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

२. प्रयोगात सहभागी झालेल्या दैवी बालिका
(टीप १) आणि त्यांनी केलेली रंगभूषा यांविषयीची माहिती

२ अ. कु. अपाला आैंधकर (वय १० वर्षे)

या दैवी बालिकेने उच्च स्वर्गलोकातून (टीप २) पृथ्वीवर जन्म घेतला आहे. तिची आध्यात्मिक पातळी (टीप ३) ५६ टक्के आहे.

२ आ. कु. प्रिशा सभरवाल (वय ११ वर्षे)

या दैवी बालिकेने महर्लोकातून (टीप २) पृथ्वीवर जन्म घेतला आहे. तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के (टीप ४) आहे.

दोन्ही दैवी बालिका ‘भरतनाट्यम्’ नृत्य शिकल्या आहेत.

टीप १ – दैवी बालक : सध्याचा काळ हा कलियुगांतर्गत कलियुगांतील छोटेसे कलियुग संपून छोटेसे सत्ययुग येण्याच्या मधील परिवर्तनाचा काळ, म्हणजेच संधिकाळ आहे, असे द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. संधिकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेकपटींनी मिळते. त्यामुळे संधिकाळाचा लाभ करून घेण्यासाठी अनेक जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांना ‘दैवी बालक’, असे संबोधतात. दैवी बालकांची मागील जन्मीची साधना असते. त्यांना ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळही असते, तसेच त्यांच्यामध्ये ईश्‍वराप्रती भाव असतो. त्यामुळे ही मुले लहान वयातच साधनेला लागतात.

टीप २ – भू, भुवर्, स्वर्ग, महर्, जन, तपस् आणि सत्य असे सप्तलोक आहेत. यांपैकी स्वर्ग आणि त्यापुढील लोक यांना ‘उच्च लोक’ असे म्हणतात.

टीप ३ – आध्यात्मिक पातळी : निर्जीव वस्तू म्हणजे शून्य टक्का आणि ईश्‍वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी, असे गृहीत धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार तिची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्‍चित करता येते. एका संतांना समष्टी कार्याच्या आवश्यकतेनुसार साधकांच्या आध्यात्मिक पातळीविषयी ध्यानातून उत्तरे मिळतात. त्याविषयीचे लिखाण सनातन प्रभात नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येते.

टीप ४ – ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महत्त्व – ‘ईश्‍वराची आध्यात्मिक पातळी जर १०० टक्के मानली आणि निर्जीव वस्तूंची ० टक्के मानली, तर सर्वसाधारण मनुष्याची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. या पातळीची व्यक्ती केवळ स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार करते. तिचे समाजाशी काही देणे-घेणे नसते आणि ‘माझ्यामुळेच सर्वकाही होते’, असा तिचा विचार असतो. आध्यात्मिक पातळी ३० टक्के होतेे, तेव्हा ती ईश्‍वराचे अस्तित्व थोड्या प्रमाणात मान्य करू लागते, तसेच साधना आणि सेवा करू लागते. मायेची आणि ईश्‍वरप्राप्तीची ओढ सारखीच झाली की, व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्के होते. आध्यात्मिक पातळी जेव्हा ६० टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती मायेपासून अलिप्त होऊ लागते. तिच्या मनोलयाला आरंभ होतो आणि तिला विश्‍वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्यूनंतर ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटते आणि तिला महर्लोकात स्थान प्राप्त होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२ इ. रंगभूषा

या प्रयोगातील दोन्ही दैवी बालिकांनी भरतनाट्यम् हे नृत्य सादर करण्यासाठी सध्या प्रचलित असणारी रंगभूषा केली होती. रंगभूषेमध्ये अलंकार घालणे, नृत्याचा पोषाख परिधान करणे, तोंडवळ्यावरील हावभाव उठून दिसण्यासाठीही रंगभूषा करणे (‘पॅन स्टिक’, ‘पावडर’, ‘रूझ’, काजळ, ‘आय लायनर’, ‘आय शॅडो’, ‘लिप-स्टिक’ इत्यादी तोंडवळ्यावर लावणे), पायांमध्ये घुंगरू बांधणे, हातापायांच्या तळव्यांना अल्ता लावणे इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होता.

या चाचणीत दोन्ही बालिकांची प्रभावळ मोजण्यासाठी त्यांच्या लाळेचा ‘नमुना’ म्हणून वापर करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू’, ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील goo.gl/Kq3ocC या गुगल लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

३. केलेली निरीक्षणे

३ अ. निरीक्षणांचे विवेचन

३ अ १. रंगभूषा करण्यापूर्वी कु. अपालामध्ये थोड्या प्रमाणात असणार्‍या नकारात्मक ऊर्जेत रंगभूषा केल्यानंतर थोडी वाढ होणे, तर कु. प्रिशामध्ये रंगभूषा करण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे आणि रंगभूषा केल्यानंतरही तिच्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे

कु. अपालाच्या संदर्भात केलेले निरीक्षण पाहूया. रंगभूषा करण्यापूर्वी तिच्यामध्ये थोड्या प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तेव्हा ‘यू.टी.एस्.’ स्कॅनरने १०० अंशाचा कोन केला होता. त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जेला प्रभावळ नव्हती. (स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच आपल्याला प्रभावळ मोजता येते.) अपालाने रंगभूषा केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली. तेव्हा स्कॅनरने १२० अंशाचा कोन केला. कु. प्रिशामध्ये रंगभूषा करण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. रंगभूषा केल्यानंतरही तिच्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही.

रंगभूषा करण्यापूर्वी आणि रंगभूषा केल्यानंतर दोघींमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

३ अ २. रंगभूषेचा कु. अपाला आणि कु. प्रिशा यांच्यावर सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात काही परिणाम न होणे

रंगभूषा करण्यापूर्वी अपालामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती आणि रंगभूषा केल्यानंतरही तिच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही. रंगभूषा करण्यापूर्वी प्रिशामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला होता. रंगभूषा केल्यानंतरही तिच्यातील सकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली.

३ अ ३. रंगभूषा केल्यावर कु. अपालाची प्रभावळ न्यून होणे आणि कु. प्रिशाची प्रभावळ थोडी वाढणे

रंगभूषा करण्यापूर्वी अपाला आणि प्रिशा यांची स्वतःची प्रभावळ अनुक्रमे १.७३ मीटर आणि २.१० मीटर होती. त्यांनी रंगभूषा केल्यानंतर त्यांची प्रभावळ अनुक्रमे १.५५ मीटर आणि २.१७ मीटर झाली. याचा अर्थ अपालाची प्रभावळ घटली आणि प्रिशाची प्रभावळ थोडीशी वाढली.

 

४. निरीक्षणांवरील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. रंगभूषेचा कु. अपालावर नकारात्मक परिणाम होणे;
पण कु. प्रिशावर नकारात्मक परिणाम न होणे, यामागील अध्यात्मशास्त्र

४ अ १. रंगभूषेमधील कृत्रिम घटकांमुळे त्यांच्याकडे नकारात्मक स्पंदने आकृष्ट होत असणे आणि या नकारात्मक स्पंदनांचा परिणाम वाईट शक्तींचा त्रास असलेल्या व्यक्तीवर होण्याची शक्यता अधिक असणे

आजकाल रंगभूषेमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंमध्ये कृत्रिम घटकांचे प्रमाण अधिक असते, उदा. रंगभूषेसाठी वापरण्यात येणार्‍या वस्तूंतील रासायनिक घटक, खोटे दागिने (इमिटेशन ज्वेलरी), केसांत माळण्यासाठी असलेली प्लास्टिकची वेणी इत्यादी. अशा कृत्रिम घटकांकडे वातावरणातील नकारात्मक स्पंदने आकृष्ट होतात. त्यामुळे रंगभूषा केलेल्या जिवाला या नकारात्मक स्पंदनांचा त्रास होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तींचा (टीप) त्रास असेल, तर कृत्रिम घटकांकडे आकृष्ट होणार्‍या नकारात्मक स्पंदनांचा तिला त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अपालाला थोड्या प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास आहे, हे तिच्यामध्ये थोड्या प्रमाणात असलेल्या नकारात्मक स्पंदनांवरून ‘यू.टी.एस्.’ स्कॅनरद्वारे स्पष्ट झाले. याउलट प्रिशा हिला वाईट शक्तींचा त्रास अजिबात नाही. यामुळे रंगभूषा केल्याने अपालातील नकारात्मक ऊर्जा वाढली, तसेच तिची प्रभावळ थोड्या प्रमाणात घटली; पण प्रिशावर असा परिणाम दिसून आला नाही.

टीप – वाईट शक्ती : ‘वातावरणात चांगल्या आणि वाईट (त्रासदायक) शक्ती कार्यरत असतात. साधना केल्याने साधकाकडे चांगल्या शक्ती आकृष्ट होतात. साधनेमुळे वातावरणातील चांगल्या शक्तीचे आधिक्यही वाढते आणि वाईट शक्तींची शक्ती घटते. असे होऊ नये, यासाठी वाईट शक्ती साधकांच्या साधनेत विघ्ने आणतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’)

४ अ २. व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीनुसार एखाद्या रजतमात्मक गोष्टीचा तिच्यावर परिणाम होणे किंवा न होणे

अपाला आणि प्रिशा दोघींच्या आध्यात्मिक पातळीमध्ये भेद आहे. अपालाची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के आहे, तर प्रिशाची ६१ टक्के आहे. ६० टक्के पातळीच्या पुढे व्यक्तीच्या मनोलयाला आरंभ होतो, तसेच तिचे मायेचे आकर्षणही आणखी न्यून झालेले असते. त्यामुळे तिचा रंगभूषा करण्यासारख्या मायेतील कृती करण्याचा कल, तसेच तिला ‘आपण चांगले दिसावे’, असे वाटणे, म्हणजे तिची देहबुद्धी न्यून झालेली असते. आध्यात्मिक पातळीनुसार प्रिशाला नृत्याच्या वेळीच नव्हे, तर एरव्हीही रंगभूषा करायला आवडत नाही. तिने या प्रयोगासाठी केवळ गुर्वाज्ञा म्हणून रंगभूषा केली होती. त्यामुळे प्रिशावर रंगभूषेसारख्या रज-तमात्मक गोष्टीचा परिणाम झाला नाही.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२.११.२०१७)

ई-मेल : [email protected]

Leave a Comment