९.२.२०१७ या दिवशी डॉ. श्रीनारायण सिंह यांनी त्यांची पत्नी सौ. राधा सिंह आणि मुलगी कु. सविता सिंह यांच्यासमवेत सनातनच्या गोव्यातील रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. डॉ. श्रीनारायण सिंह यांना वर्ष २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून ‘तोंडखुरी पायखुरी’ या गायीच्या लसीच्या शोधासाठी प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. ते ‘बायोव्हेट प्रा. लि.’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मालूर येथे असतात. त्यांच्या पत्नी सौ. राधा यांनी मथुरा येथील परम संत डॉ. चतुर्भुज सहायजी महाराज यांचा अनुग्रह घेतला आहे.
१. सौ. राधा सिंह यांनी दिलेले अभिप्राय
१ अ. आश्रम : ‘या आश्रमात आल्यावर ‘मी माझ्याच गुरूंच्या आश्रमास भेट देत आहे’, असे मला वाटले. ‘सनातन आश्रम हा गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या दोहोंचे समीकरण आहे’, असे जाणवले.
१ आ. स्वागतकक्षात ठेवलेले श्रीकृष्णाचे चित्र : हे चित्र पुष्कळ मोहक वाटले आणि त्याकडे पाहून मी स्तंभित झाले.
१ इ. ध्यानमंदिर : गुरूंचे तत्त्व ध्यानमंदिरात आहे. मला माझ्या गुरूंचे अस्तित्व तेथे जाणवले.
१ ई. भोजनकक्ष : ‘ताटात जेवण कसे वाढून घ्यावे ?’, याचा फ्लेक्स भोजनकक्षात लावला आहे. या आचरणातूनच ‘जेवतांना चैतन्य कसे टिकवून ठेवायचे’, हे आश्रमात पाळले जाते’, असे मला जाणवले.’
२. कु. सविता (रिंकी) सिंह यांनी दिलेला अभिप्राय
२ अ. सनातन संस्थेचे ग्रंथ हिंदु धर्मात आचरणात येणार्या कृतींच्या मागची धार्मिक कारणे सांगत असल्याने नवीन पिढीला धर्मज्ञान मिळून धर्माकडे वळणे सोपे जाईल !
‘हिंदु धर्मात आचरणात येणार्या प्रत्येक कृतीच्या मागे काहीतरी कारण असते आणि हे कारण नवीन पिढी विचारत असते. ही धार्मिक कारणे सनातन संस्थेचे ग्रंथ सांगत आहेत. हे एक मोठे कार्य असून यामुळे नवीन पिढीला चांगली दिशा मिळत आहे. यामुळे धर्मज्ञान वाढून धर्माकडे वळणे सोपे जाईल.’