भादरा (राजस्थान) – येथील प्रबलजी महाराज यांच्या आश्रमामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या समवेतच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे फलकही लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा अनुमाने ५ सहस्र भाविकांना लाभ घेतला.
मान्यवरांकडून सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी गौरवोद्गार
१. विधालय येथील प्राचार्य डॉ. विदिश दत्त शर्मा हे सनातन प्रभातविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, ‘‘जर आम्हाला पहाडावर जाऊन काही मिळवायचे आहे आणि तेच आम्हाला घरबसल्या मिळाले, तर पहाडावर कोण जाईल ? सनातन प्रभात नियतकालिकाचेही असेच आहे. यात हिंदु धर्माविषयी सर्व माहिती घरबसल्या मिळते.’’
२. अखिल भारतवर्षीय धर्मसंघाचे उत्तराधिकारी प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांनी सनातनच्या साधकांची भेट घेतली. या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी सांगितले, ‘‘ज्या वृक्षाची फळे इतकी मधूर आहेत, तो वृक्ष कसा असेल, याची कल्पना येते.’’ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाविषयी गौरवाद्गार काढतांना म्हणाले, ‘‘ज्या भूमीमध्ये (आश्रमामध्ये) इतक्या उच्च कोटीचे संस्कार करण्यात येतात, त्या पवित्र भूमीला मी पुन: पुन्हा वंदन करतो.’’