टीका : महाशिवरात्रीनिमित्त शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक न करता ते दूध अनाथांना द्या !
खंडण : भगवान शिवाला अभिषेक शक्यतो दुधाचा करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो. दूध हे शक्तीचे प्रतीक असल्याने त्याचा अभिषेक शिवपिंडीवर केला जातो, हे त्यामागचे अध्यात्मशास्त्र आहे. असे केल्याने त्याचा पूजकाला आध्यात्मिक लाभ होतो. आज शिवपिंडीवर दूध वाहण्यास आक्षेप घेणार्यांनी उद्या हिंदूंच्या देवदर्शनावरही आक्षेप घेतल्यास आश्चर्य वाटू नये ! (हिंदूंनी भूलथापांना बळी न पडता त्यांना धर्मशास्त्राप्रमाणेच आचरण करण्यास साहाय्य होईल.)