जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर)
येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात प्रदर्शन लावण्यासाठी श्री सिद्धेश्वर मंडळातील विश्वस्त आणि पदाधिकारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्रदर्शनस्थळी युवकांचा नवा महाराष्ट्रचे संपादक श्री. अशोक कोळेकर, जयसिंगपूर येथील वार्ताहर प्रतिनिधी यांनी प्रदर्शनस्थळाचे ध्वनीचित्रीकरण केले आणि सनातन संस्थेचे साधक श्री. अण्णासाहेब वरेकर यांची २ मिनिटांची मुलाखत घेतली.
सांगली
आमदार मोहनराव कदम आणि जिल्हाधिकारी काळम पाटील यांची प्रदर्शनाला भेट
सागरेश्वर येथे लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनास सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार श्री. मोहनराव कदम यांनी सदिच्छा भेट दिली. याच समवेत दंडोबा मंदिर, दंडोबा डोंगर (मिरज) येथे लावलेल्या प्रदर्शनास सांगलीचे जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार काळम पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. जिल्हाधिकार्यांना साप्ताहिक सनातन प्रभातचा अंक भेट देण्यात आला.
या वेळी समितीचे श्री. गिरीश पुजारी यांनी जिल्हाधिकार्यांना व्हॅलेंटाईन डेच्या विरोधातील समितीच्या जनजागृती मोहिमेच्या माहितीचे हस्तपत्रक दिले. जिल्हाधिकार्यांना कार्याचे कौतुक करून अशा कार्याची आज आवश्यकता आहे, असे सांगितले.
कल्याण

भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी सनातनच्या ग्रंथांची माहिती जाणून घेतली.
कल्याण येथील श्री शंकर मंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी भेट दिली. त्यांनी सनातनच्या ग्रंथांची माहिती जाणून घेत ग्रंथ खरेदीही केली.
येथे एका धर्माभिमान्याने लव्ह जिहादचा ग्रंथ घेत तो हिंदू तरुणींनी वाचायलाच हवा, असे म्हणत सनातनच्या कार्याची प्रशंसा केली.
डोंबिवली

येथील ग्रंथप्रदर्शनाला विभागप्रमुख श्री. सुधीर पोवार आणि राज्यमंत्री, तसेच आमदार रवींद्र चव्हाण यांनीही भेटी दिल्या.
रायगड
७६ ठिकाणी लावलेल्या प्रदर्शनांना चांगला प्रतिसाद
खोपोली
येथील ग्रंथ प्रदर्शनाला येथील नगराध्यक्षा सौ. सुमन औरसमल आणि नगरसेवक श्री. नितीन मोरे यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

नवीन पनवेल
येथील प्रदर्शनाला आमदार श्री. विवेक पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. चारुशीला घरात आणि जे.एम्. म्हात्रे, तसेच श्री. बाळाराम पाटील आणि मंदिराचे विश्वस्त श्री. भरत पाटील यांनी भेट दिली.
श्री गाढेश्वर मंदिरात भाविकांना विषय मांडण्यासाठी मंदिराचे विश्वस्त श्री. कांडपिळे यांनी अनुमती दिली.

पेण
येथील पाटणेश्वर गावात लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला नगराध्यक्षा सौ. प्रीतम पाटील यांनी भेट दिली.
नाशिक
सिन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले आणि
माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमा कोकाटे यांची भेट

येथील श्री गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथे लावलेल्या प्रदर्शनाला सिन्नर नगरपालिका माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमा कोकाटे यांनी भेट दिली. या वेळी त्यांना साप्ताहिक सनातन प्रभातचा अंक भेट दिला.
श्री. उगले म्हणाले, मला सनातनचे सर्व साहित्य आणि ग्रंथ पहायचे आहे. लव्ह जिहाद हा ग्रंथही मला पुष्कळ आवडला. मी तो ग्रंथ इतरांनाही वितरीत करीन. येथील सिन्नर लोकल केबलवर ध्वनीचित्रचकत्या दाखवू शकतो.
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी
मुंबई – महाशिवरात्रीनिमित्त मुंबई जिल्ह्यामध्ये १२५ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. काही मान्यवरांनी त्याला भेट दिली.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काळाराम मंदिर, गिरगाव येथे ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ खरेदी केले.

भूलिंगेश्वर मंदिर येथील ग्रंथ प्रदर्शनाला भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी भेट दिली.

आमदार श्री. सुनील शिंदे यांनी केदारेश्वर ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन सात्त्विक उत्पादनांची खरेदी केली आणि सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट देतो, असे सांगितले.
भायखळा विभागच्या भाजपच्या नगरसेविका सौ. सुरेखा रोहिदास लोखंडे, माझगाव, ताडवाडी नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुलकर, अशोकवन दहिसर (पूर्व) येथील आमदार श्री. प्रवीण दरेकर यांनीही सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.
महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेद्वारे
बिहार आणि उत्तरप्रदेश येथे विविध ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन
वाराणसी – महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेद्वारे बिहार आणि उत्तरप्रदेश येथे विविध ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. बिहारमधील मुजफ्फरपूर, सोनपूर, पटणा आणि उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर अन् वाराणसी येथे लावलेल्या सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
क्षणचित्रे
१. काही भाविकांनी स्वतःहून अन्य भाविकांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची माहिती सांगून ते घेण्याविषयी प्रेरित केले.
२. मुजफ्फरपूर येथील सनातन प्रभातच्या एका वाचकांनी एका दुकानदाराला त्याच्या दुकानापुढील साहित्य काढायला सांगून तेथे प्रदर्शन लावण्यास जागा उपलब्ध करून दिली, तसेच यापुढेही अशा प्रकारे साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.