
रायगड – येथे ९ फेब्रुवारी या दिवशी कामोठे येथे रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांची हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि सनातन संस्थेच्या सौ. संगीता लोटलीकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी पनवेलचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते. श्री. चव्हाण यांना सनातन संस्थेचा ग्रंथ भेट देण्यात आला, तसेच देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची विनंतीही या वेळी श्री. चव्हाण यांना करण्यात आली.