पलूस (जिल्हा सांगली) – जीवनात आपल्याला नेहमी ताण-तणावाला सामोरे जावे लागते. हा ताण निर्माण होण्यामागे स्वभावदोषही कारणीभूत असतात. आपण नियमितपणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवली तर तणावमुक्ती सहज शक्य आहे. याच समवेत ताण घालवण्यासाठी विविध शारीरिक, मानसिक, बौद्धिक उपाय योजनांसमवेत आध्यात्मिक उपाय म्हणजेच साधनाही आवश्यक आहेत. ही साधना आपल्याला सतत आनंदी रहायला शिकवते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. त्या येथे ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तणावमुक्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन या विषयावर आयोजित मार्गदर्शनात बोलत होत्या.
या मार्गदर्शनाचे आयोजन हॉटेल न्यू अनिता एक्झिकेटिव्हचे मालक श्री. सुघेंद्रन यांनी केले होते, तर हे मार्गदर्शन न्यू श्रीकृष्ण ट्रेडर्सचे मालक श्री. अनिल सूर्यवंशी यांच्या कार्यालयात घेण्यात आले. याचा लाभ ४० व्यावसायिकांनी घेतला. मार्गदर्शन झाल्यावर किर्लोस्कर ब्रदर्स लि. या आस्थापनेचे निवृत्त व्यवस्थापक श्री. साहेबराव आनंदराव पाटील यांनी, असे कार्यक्रम वरचेवर व्हावेत आणि असे विषय समाजापर्यंत पोहोचला हवेत., असे मनोगत व्यक्त केले. सर्व व्यावसायिकांनी महिन्यातून एकदा एकत्र येण्याचा निश्चय केला.