बारामती (जिल्हा पुणे) – येथे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संक्रांत या सणाविषयी माहिती देणारे चलचित्र (व्हिडिओ) महिलांना दाखवण्यात आले. महिलांना वाण म्हणून देवतांची नामपट्टी देण्यात आली. या वेळी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यक्रमाला सनातनच्या नियतकालिकांच्या वाचक असलेल्या ११९ महिला उपस्थित होत्या.
ठाकूरकी (तालुका फलटण) येथे सामूहिक हळदी-कुंकू कार्यक्रम
ठाकूरकी (तालुका फलटण) – येथील पद्मावती मंदिर येथे स्थानिक महिलांच्या सामूहिक हळदी-कुंकू कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती डोईफोडे यांनी समितीच्या कार्याची ओळख आणि मकरसंक्रांत, रथसप्तमी या सणांची अध्यात्मशास्त्रीय माहिती दिली, तसेच ७ फेब्रुवारी या दिवशी सोलापूर येथे होणार्या धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले.
प्रवचन झाल्यावर महिलांनी सांगितले की, हे विषय आम्हाला ठाऊक नव्हते. पुढील वर्षापासून आम्ही वाण म्हणून अन्य वस्तू न आणता आध्यात्मिक उपयोगी वस्तू देऊ. या कार्यक्रमाला येथील रहिवासी श्री. राजाराम शिंदे यांचे सहकार्य लाभले.