कु. मेघा चव्हाण यांच्या मनाच्या निर्मळतेमुळे त्यांच्या त्वचेमध्ये आप आणि तेज यांच्या स्तरांवर कार्यरत झालेले चैतन्य त्यांच्या त्वचेच्या चकाकीतून प्रगट होते. त्यांच्यामध्ये ईश्वराचा ‘निरागसता’ हा दैवी गुण प्रबळ असल्याने त्यांच्यातील दिव्यता त्यांच्या त्वचेच्या चकाकीतून आणि स्थूल देहातील इतर दैवी पालटांतून दिसून येतात.
कु. मेघा चव्हाण यांची साधकांना जाणवणारी वैशिष्ट्ये
१. तोंडवळ्यावरील स्मितहास्य – आध्यात्मिक कारण
तोंडवळा हा मनाचा आरसा आहे. ज्याच्या मनात सात्त्विकतेचे तरंग निरंतर उमटून त्यातून सात्त्विक सुखाचे प्रक्षेपण होत असते, अशा व्यक्तीचा तोंडवळा पहातांना सात्त्विक सुखाची अनुभूती येते. सात्त्विक सुखासह साधनेमुळे प्राप्त होणार्या आनंदाचे तरंग जेव्हा अंतर्मनातून बाह्यमनापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडवळ्यावरील निरामय हास्याद्वारे ते व्यक्त होऊ लागतात. कु. मेघा चव्हाण यांच्या तोंडवळ्यावरील स्मितहास्य हे त्यांच्या निर्मळ अंत:करणात उमटणार्या आनंदतरंगांचेच प्रतिबिंब आहे.
२. गालांच्या उंचवट्याकडील भाग चमकतो. – आध्यात्मिक कारण
निर्मळ अंत:करणामुळे आकृष्ट होणारे ईश्वरी चैतन्य गालांच्या उंचवट्याकडील भागांमध्ये साठते. त्यामुळे त्यांच्या त्वचेमध्ये दैवी पालट होऊन त्यांच्या गालाचे उंचवटे अधिक चमकतात.
३. त्वचेत गुलाबीपणा – आध्यात्मिक कारण
प्रीतीचा सूक्ष्म रंग गुलाबी आहे. निर्मळ अंत:करणामध्ये प्रीतीचे तरंग उमटल्यामुळे त्वचेवर गुलाबी रंगाची झाक दिसून येते. त्यामुळे त्यांची त्वचा गुलाबी दिसते.
४. निरागसता (लहान मुलांप्रमाणे वाटणे) – आध्यात्मिक कारण
कु. मेघा चव्हाण यांचा सूक्ष्म अहं १२ टक्के इतका अल्प असल्यामुळे त्यांच्या अंत:करणातील निर्मळता निरागस स्वभावाच्या स्वरूपात प्रगट होतांना जाणवते.
५. निर्मळता – आध्यात्मिक कारण
गेल्या जन्मी केलेल्या साधनेमुळे सूक्ष्म अहं अल्प होऊन मनामध्ये ईश्वरी चैतन्य अनुभवल्याचा संस्कार निर्माण झाल्यामुळे त्यांच्या चित्तात ईश्वरी चैतन्याचे स्थान निर्माण झाले आहे. या चैतन्याच्या प्रभावामुळे त्यांचे अंतर्बाह्य मन अतिशय शुद्ध झालेले असून त्यांना निर्मळता प्राप्त झालेली आहे.
६. पारदर्शकता – आध्यात्मिक कारण
चित्तामध्ये कार्यरत असणार्या ईश्वरी चैतन्याचा परिणाम मनावर झाल्यामुळे त्यांचे मन निर्मळ झाले आहे. या चैतन्याचा परिणाम त्यांच्या कारणदेहावर, म्हणजे बुद्धीवर झाल्यामुळे त्यांची बुद्धी दोषमुक्त झालेली आहे. दोषमुक्त बुद्धीमुळे ‘पारदर्शकता’ हा दैवी गुण प्राप्त होतो. या गुणामुळे चैतन्याचे प्रक्षेपण पेशीपेशीतून आरपार होऊ लागते.
७. जवळीक – आध्यात्मिक कारण
अहं अल्प असल्यामुळे त्यांच्या मनात अव्यक्त प्रेम आहे आणि त्यांना प्रत्येक प्राणीमात्राविषयी जवळीक अन् आपुलकी जाणवते.
८. भाव – आध्यात्मिक कारण
त्यांनी गेल्या जन्मी भक्तीयोगानुसार केलेल्या साधनेमुळे त्यांच्या चित्तावर भावाचा संस्कार झालेला आहे. त्याच संस्कारातून प्रक्षेपित होणार्या भावलहरींमुळे त्यांच्याकडे पहातांना भाव जाणवतो.
९. डोळ्यांत प्रेमभाव – आध्यात्मिक कारण
निर्मळ अंत:करणाच्या व्यक्तीमध्ये त्यांच्या मनातील प्रीती त्यांच्या डोळ्यांच्या दृष्टीतून व्यक्त होत असते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांत प्रेमभाव जाणवतो.
१०. डोळ्यांत शून्यता आणि ‘आपल्याकडे बघूनही बघत नाहीत’, असे वाटणे – आध्यात्मिक कारण
निर्गुणाकडे वाटचाल चालू झाली की, एकप्रकारची स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होऊ लागते. या अवस्थेमुळे व्यक्ती सगुणात (मायेत) असूनही नसल्याप्रमाणे वावरत असते. यालाच ‘शून्याकडे ओढ असणे किंवा शून्यत्वाकडे वाटचाल करणे’, असे म्हणतात. डोळ्यांतील शून्यता ही व्यक्तीच्या साधनेचा कल निर्गुणाकडे असल्याचे द्योतक आहे.
११. अनाहतचक्राकडे पुष्कळ आनंद – आध्यात्मिक कारण
हृदयातील अंत:स्थ प्रेमभाव आणि चित्तशुद्धी यांमुळे प्राप्त होणारी निर्मळता यामुळे अनाहतचक्राची शुद्धी होऊन त्याची जागृती होते. कार्यरत झालेल्या अनाहतचक्रातून प्रेमभाव आणि निर्मळता यांच्या अनुभूतीतून मिळणारा निखळ आनंद अनाहतचक्रातून प्रक्षेपित होणार्या लहरींमधून व्यक्त होतो.
१२. अहं न्यून – आध्यात्मिक कारण
गेल्या जन्मी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करून अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबल्यामुळे त्यांचा अहं १२ टक्के इतका अल्प आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात आनंद जाणवतो आणि अहंशून्यता जाणवते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०१७, रात्री १०.३०)
(तोंडवळ्यावरील स्मितहास्य, गालांच्या उंचवट्याकडील भाग चमकणे, त्वचेत गुलाबीपणा, जवळीक, भाव इत्यादी गुणविशेष मेघामध्ये आढळतात. – कु. प्रियांका लोटलीकर (१७.११.२०१७))