
अमरावती – अमरावती शहर, मोर्शी आणि मूर्तीजापूर गावांमध्ये सनातनच्या धर्मरथाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. मूर्तीजापूर गावात ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष चंदन अग्रवाल, भाजप शहराध्यक्ष भारत भगत, तसेच स्थानिक ज्येष्ठ समाजसेवक कमलाकर गावंडे यांनी धर्मरथाचे पूजन करून प्रसारकार्याला प्रारंभ केला. त्यांनी धर्मरथाला सदिच्छा भेट दिली आणि सनातनचे कार्य उत्तम असल्याचे सांगितले.