कर्नाटकमधील याज्ञवल्क्य मठाच्या स्वामीजींचा नगर दौरा भावपूर्णरित्या पार पडला

नगर – राष्ट्रचिंतन आणि विश्वकल्याण दिग्विजय रथयात्रेनिमित्त कर्नाटकमधील होणसीहुळ्ळे येथील याज्ञवल्क्य मठाचे प.पू. श्री श्री श्री १००८ विद्यावारिधीतीर्थ स्वामीजी यांचा २६ ते २८ जानेवारी या कालावधीतील नगर जिल्ह्याचा दौरा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. २६ जानेवारीला त्यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील श्रीराम चौक, सावली सोसायटी, पंकज कॉलनी येथे त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले. या वेळी पुण्याहवाचन, देवतापूजन, नवग्रहशांती, श्रीदत्तयाग आणि रुद्राभिषेक हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. यानंतर स्वामीजींची खडीसाखर, साखर आणि गूळ यांनी तुला करण्यात आली.
सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी गौरवोद्गार !

कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन पाहून स्वामीजींनी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी ‘‘कर्नाटकमध्ये झालेल्या समितीच्या सभेला मी गेलो होतो. समितीने संघटन चांगले केले आहे. तुमच्या गुरुदेवांना हा प्रसाद द्या आणि हे अर्पणरुपी आशीर्वाद द्या’’, असे म्हणून ५० रुपये आणि खडीसाखरेचा प्रसाद दिला. सर्वश्री प्रा. अशोक जोगदे, विजय देशपांडे, सतीश गुंफेकर, प्रकाश गुंफेकर, हरिश्चंद्र लोंढे, विलास राजहंस यांचा आयोजनात पुढाकार होता.