सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साधकांना होणार्या आध्यात्मिक त्रासांतही वाढ होत आहे. साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून (कमी) होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपायांचे साहित्य उपलब्ध करून देऊन साधकांना चैतन्य दिले आहे. ते साहित्य किती काळ वापरायचे ?, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. तीव्र त्रास असलेल्या साधकांना आध्यात्मिक उपायांसाठी साहित्य दिले जाते. ते साहित्य सतत वापरल्यामुळे त्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते, तसेच काही साहित्य जीर्णही होते. त्यामुळे ते साहित्य पालटून नवीन साहित्य घेणे आवश्यक आहे.
२. संतांनी वापरलेले कपडे, त्यांनी लिहिलेले कागद, औषधाचे वेष्टन, त्यांनी दिलेली विभूती इत्यादी साहित्य सर्वसाधारणपणे २ वर्षे वापरावे. संतांच्या खोलीतील फरशीचा तुकडा ५ वर्षे वापरू शकतो. या कालावधीनंतर हे साहित्य अग्नी किंवा पाणी यामध्ये विसर्जित करावे आणि उत्तरदायी साधकांकडून उपायांसाठी नवीन साहित्य घ्यावे. या २ वर्षांच्या कालावधीच्या पूर्वीच एखादे साहित्य खराब झाल्यास किंवा त्यावर वाईट शक्तीचे आक्रमण झाल्यास ते साहित्य विसर्जित करावे.
३. उपायांसाठी वापरत असलेले साहित्य २ वर्षांनीही स्थुलातून चांगल्या स्थितीत असेल, तर ते भारित करून पुन्हा वापरू शकतो. साहित्य भारित करण्यासाठी पुढीलपैकी एखादी पद्धत वापरावी – साहित्य देवाजवळ ठेवणे, उन्हात ठेवणे, साहित्याला नामपट्ट्यांचे मंडल घालणे, ते उदबत्तीने भारित करणे इत्यादी. संतांनी वापरलेले कपडे भारित करण्यासाठी ठेवतांना ते धुऊन भारित करण्यासाठी ठेवावे.
४. भारित झालेले साहित्य पाहिल्यावर डोळ्यांना चांगले वाटते. ते हातात घेतल्यावर हलके जाणवते. साहित्याचा वास घेतल्यावर श्वास घेतांना अडथळा येत नाही आणि पूर्ण श्वास घेता येतो. अशा प्रकारे साहित्य भारित झाले आहे, हे ओळखता येते.
– कु. कल्याणी गांगण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.