वडनेरभैरव (नाशिक) येथे मकरसंक्रांतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचन

वडाळीभोई येथील प्रवचनाला उपस्थित महिला

नाशिक  – येथील वडनेरभैरव येथे एकता ग्रुपच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वसुधा चौधरी यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि लाभ तसेच धर्मशिक्षणाचे महत्त्व या विषयावर प्रवचन घेतले. याचा लाभ १५० महिलांनी घेतला या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते.

जिज्ञासू महिलांच्या प्रतिक्रिया

आम्हाला मकरसंक्रांतीची शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. आजपर्यंत केवळ ऐकीव माहितीवर सण साजरा करत होतो.

 

वडाळीभोई ग्रामपंचायत (नाशिक) येथेही प्रवचनाचे आयोजन

वडाळीभोई येथे सौ. ज्योती पंडित यांनी घेतलेल्या प्रवचनाचा ५०० महिलांनी लाभ घेतला वैशिष्ट्यपूर्ण

१. सरपंच सौ. अनिता जाधव आणि उपस्थित महिलांना विषय पुष्कळ आवडला. त्यांनी प्रवचन संपल्यानंतर अजून ३० मिनीटे विषय घेण्यास सांगितला. प्रवचनानंतर शंकांचे निरसन करून घेण्यासाठी पुष्कळ महिला थांबल्या होत्या.

२. वडाळीभोई येथील सरपंच सौ. अनिता जाधव यांनी ४ दिवस आधी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले प्रवचन ऐकले होते. त्या वेळी त्यांनी प्लास्टिकच्या वस्तू वाण म्हणून देऊ नयेत, तसेच  त्यामागील शास्त्र काय ? हा विषय ऐकला. त्यानुसार त्यांनी वाण देण्यात पालट केला.

येथे पोलीस ठाण्यात सर्व पोलीस विभागांतील महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात सनातन संस्थेच्या सौ. ज्योती पंडित यांनीही संक्रांतीचे महत्त्व सांगितले. या वेळी ४० महिला उपस्थित होत्या. समारंभात उपस्थित असलेल्या वडाळीभोई या गावाच्या सरपंच सौ. अनिता जाधव उपस्थित होत्या. त्यांनी उत्स्फुर्तपणे त्यांच्या गावात हळदीकुंकू समारंभाच्या वेळी प्रवचन घेण्याची मागणी केली.

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment