ठाणे येथील डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे आणि श्री. रमेश बोंडाळे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

रामनाथी (गोवा) – ठाणे येथील डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे आणि श्री. रमेश बोंडाळे यांनी येथील सनातन आश्रमाला २२ जानेवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली, तसेच २ दिवस आश्रमात वास्तव्य केले. या वेळी सनातनच्या साधिका डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे आणि श्री. रमेश बोंडाळे यांना आश्रमात चालणारे आध्यात्मिक संशोधन, तसेच राष्ट्र अन् धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. नृत्य, संगीत आदी कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती याविषयीही त्यांना अवगत करण्यात आले. आश्रमातील सूक्ष्म शक्तींद्वारे होणारे चांगले आणि वाईट परिणाम दर्शवणार्‍या वस्तूंचे प्रदर्शन पाहिल्यावर डॉ. (सौ.) बोंडाळे यांनी त्याविषयी जिज्ञासेने  शंकानिरसन करून घेतले.

क्षणचित्रे

१. आश्रमातील साधक व्यष्टी साधनेअंतर्गत राबवत असलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया यांविषयी सौ. बोंडाळे अत्यंत प्रभावित झाल्या आणि हे प्रयत्न स्वतः करण्याच्या दृष्टीने त्यांनी आश्रमात चालणार्‍या स्वभावदोष अन् अहं निर्मूलन सत्संगात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.

२. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या ५ दिवसीय स्वभावदोष निर्मूलन अभ्यासवर्गांमध्ये सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी अध्यात्मप्रसारासाठी वापरलेले वाहन पाहिल्यावर त्यांना वाहनाभोवती भावाची स्पंदने जाणवल्यामुळे त्यांची भावजागृती झाली.

४. येणार्‍या आपत्काळात सर्व प्रकारचे आजार आणि अपघात यांच्यावर ऊर्जेच्या माध्यमातून उपचार (एनर्जी हिलींग) हेच प्रभावी साधन असेल, असे मत त्यांनी मांडले.

डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे आणि श्री. रमेश बोंडाळे यांचा परिचय

डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे या मुंबई येथील टाटा मूलभूत अनुसंधान संस्था (टी.आय.एफ्.आर्.) येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आणि त्यांचे  पती श्री. रमेश बोंडाळे यांनी योगी महेश यांचा भावातीत ध्यानाच्या संदर्भातील निवासी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. श्री. रमेश बोंडाळे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी वर्ष २००० मध्ये त्यांचा कारखाना बंद करून पूर्णवेळ ध्यानसाधना शिकवायला प्रारंभ केला.

वर्ष २०१७ मध्ये काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि वैज्ञानिक परिषदेमध्ये डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे यांनी मानवी सूक्ष्मदेहाच्या संदर्भात शोधनिबंध सादर केला होता. याच परिषदेत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे  यांनी वनस्पती सजगता या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. या विषयावरील माहितीने त्या प्रभावित झाल्या होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment