‘परम पूज्य डॉ. आठवले यांनी कलियुगामध्ये गीतेत सांगितल्याप्रमाणे अवतार घेतला आहे ! ‘ – ह.भ.प. नामदेव महाराज वासकर

करावे गाव, सीवूड्स – प्रत्येक जण जन्मतः हिंदूच असतो. नंतर इतर संस्कार करून बळजोरीने अन्य धर्मीय त्याच्यावर धर्म लादतात. हिंदु धर्म विश्‍व धर्म व्हायला काहीच अवघड नाही. केवळ हिंदूंना जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे उद्गार ह.भ.प. नामदेव महाराज वासकर यांनी काढले. करावे गावातील हरिनाम सप्ताहात ते बोलत होते.

समितीचे डॉ. उदय धुरी यांनी राम मंदिर, गोहत्या बंदी कायदा, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण कायदा, हिंदू धर्मियांची सद्यस्थिती या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वेळी ह.भ.प. हरिदास माळी, ह.भ.प. चंद्रकांत महामुनी, श्री. शिवाजी सुतार, श्री. वसंत वांगदरे, श्री. पांडुरंग गव्हाणे, श्री. अभिमन्यू ठाकरे, श्री. ज्ञानेश्‍वर तपिसे, श्री. नामदेव वासकर, श्री. नारायण काशीद, श्री. रमेश सातपुते, श्री. अनंत सातपुते, तसेच इंद्रायणी प्रासादिक भजन मंडळाच्या महिला प्रवचनकार आणि करावे गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

संस्कृतीरक्षण करणार असल्याचे धर्मप्रेमींनी अभिमानाने सांगितले !

व्याख्यानानंतर उपस्थित धर्मप्रेमींनी अभिमानाने सांगितले की, आम्ही गुढीपाडवा हेच नववर्ष मानून साजरे करतो. आम्ही पूर्वीपासूनच केक कापणे बंद केले आहे. या वेळी एका धर्मप्रेमीने ‘लव्ह जिहादसारख्या आघातांचा मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रचार करीन’, असे आवर्जून सांगितले.

परम पूज्य डॉ. आठवले यांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे अवतार घेतला आहे !

‘परम पूज्य डॉ. आठवले यांनी कलियुगामध्ये गीतेत सांगितल्याप्रमाणे अवतार घेतला आहे. सनातन धर्माचे कार्य काळानुरूप अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच विश्‍वात हिंदु धर्माची स्थापना होईल’, असेही ह.भ.प. नामदेव महाराज वासकर यांनी म्हटले.

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment