सनातन संस्थेच्या आश्रमांना भेट दिल्यावर रामायणाची आठवण येते ! – दुर्गेश परूळकर, संस्थापक, गीता अभ्यास मंडळ

श्री. दुर्गेश परूळकर यांची त्यांच्या सहकार्‍यांसह
देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. दुर्गेश परूळकर (१) आणि त्यांच्या सहकार्‍यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याविषयी अवगत करतांना श्री. शशांक जोशी (उजवीकडे)

देवद (पनवेल) – जेव्हा जेव्हा मी सनातन संस्थेच्या आश्रमांना भेट देतो, तेव्हा मला रामायणाची आठवण येते. वसिष्ठ ऋषींनी स्वयंशासित समाजाविषयी जे लिहिले आहे, ते मला सनातनच्या आश्रमात जाणवते, असे प्रतिपादन डोंबिवली येथील गीता अभ्यास मंडळाचे संस्थापक, लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर यांनी केले. श्री. परूळकर यांनी पत्नी सौ. मेधा परूळकर, तसेच मंडळाच्या १८ सभासदांसह सनातन संस्थेच्या येथील आश्रमाला २४ डिसेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. आश्रम पहात असतांना त्यांनी वरील उद्गार काढले. आश्रमातील साधक श्री. शशांक जोशी यांनी त्यांना आश्रमात केल्या जाणार्‍या सेवांविषयी अवगत केले, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी त्यांना सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांची संकेतस्थळे दाखवली, तसेच त्यांच्याशी साधनेविषयी चर्चा केली आणि त्यांच्या शंकांचे निरसनही केले.

परात्पर गुरु परशराम पांडे यांनी श्री. दुर्गेश परूळकर यांचा सत्कार केला, तसेच सनातनचा ‘अध्यात्म विश्‍वविद्यालय’ हा ग्रंथही भेट म्हणून देण्यात आला. या वेळी परात्पर गुरु परशराम पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले.

श्री. दुर्गेश परूळकर यांना सनातनचा ‘अध्यात्म विश्‍वविद्यालय’ हा ग्रंथ भेट म्हणून देतांना परात्पर गुरु परशराम पांडे

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यातही श्री. परूळकर यांचा सहभाग !

आतापर्यंत श्री. दुर्गेश परूळकर यांचे राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विविध विषयांवरील लिखाणही सनातन प्रभातच्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. श्री. परूळकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काढण्यात येणार्‍या प्रबोधन फेर्‍यांमध्येही सहभाग घेतला होता, तसेच प्रांतीय हिंदु अधिवेशनात सहभागी होऊन हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मार्गदर्शन चालू असतांना उपस्थित सभासदांपैकी काहींना भावाश्रू आले.

२. सभासदांनी वाकून नमस्कार केल्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज हेही त्यांना नमस्कार करत होते.

गीता अभ्यास मंडळातील सभासद श्री. विशाल प्रभू यांनीही परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

श्री. दुर्गेश परुळकर यांची विनम्रता आणि संतांप्रतीचा आदरभाव !

या वेळी श्री. दुर्गेश परुळकर म्हणाले, ‘‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी आजच्या मुलांना इंटरनेटचे आध्यात्मिक उदाहरण अतिशय मार्मिक शब्दांत दिले आहे. यासह त्यांनी ‘मी ९० वर्षांचा असल्याने मला इंटरनेटविषयी माहिती नाही’, असे सांगून खर्‍या अर्थाने त्यांचे वृद्धत्व म्हणजेच परिपक्वता दाखवली.

त्यांच्या या माधुर्यानेच माझी तृप्ती झाली असून त्यांच्यापुढे मी काहीतरी बोलावे, असे मला वाटत नाही. त्यांनी केलेले मार्गदर्शन आम्ही सर्व आमच्यात साठवून ठेवू.’’

भगवद्गीतेतून बोध घेऊन स्वत:तील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करा ! – (परात्पर गुरु) पांडे महाराज

विष्णुसहस्रनामात भगवंताला ‘वृद्ध’ संबोधण्यात आले आहे. सध्या ‘वृद्ध’ याचा अर्थ निरुपयोगी असा समजला जातो. प्रत्यक्षात वृद्ध म्हणजे खर्‍या अर्थाने परिपक्व झालेला ! आज इंटरनेटचे युग आहे; मात्र आत्मा हाच खरा इंटरनेट आहे. प्रत्येकातील ‘मी’ एकच असून आतील द्रष्ट्याने आवरणाच्या आतील द्रष्ट्याशी संबंध जोडल्यास एकत्व दिसेल. कलियुगात रज-तमाचे आधिक्य आहे. त्यामुळे चैतन्य दृगोच्चर होत नाही. मनुष्य योग्य-अयोग्य न पहाता दुसर्‍याचे पाहून त्याप्रमाणे वागतो आणि त्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. बाह्य जगातून मिळणारा आनंद आणि आत्मा एकच आहे, या जाणीवेतून उत्सर्जित होणारा आनंद यांत भेद आहे कि नाही ?

भगवंताने अर्जुनाला शत्रूसह लढतांना रणांगणावर भगवद्गीता सांगितली. आपणही त्यातून बोध घेऊन स्वत:तील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केले पाहिजे. यासाठी जो आपला योगक्षेम वहातो, त्या भगवंताचे स्मरण सातत्याने केले पाहिजे. परमेश्‍वराने मला का पाठवले आहे, मला काय करायचे आहे, तसेच मी कुठून आलो, हे ओळखणे जीवनाचे लक्ष्य आहे. स्वत:चे कल्याण होण्यासाठी बाह्यांगाचे आवरण विसरून आतील चैतन्य पहायला हवे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment