मुंबई येथे श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव
श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजींचा सुवर्ण जन्मजयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा !
मुंबई – चेंबूर येथील श्री. हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्ण जन्मजयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी यांना विविध प्रकारचे पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच त्यांच्यावर सुवर्णमुद्राभिषेक करण्यात आला. या मंगल प्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने श्री. अभय वर्तक यांनी श्री महास्वामीजींच्या चरणी कृतज्ञता पुष्प अर्पण करून त्यांना ‘धर्मशिक्षण फलक’ हा सनातनचा ग्रंथ भेट दिला. या वेळी सौ. विजयलक्ष्मी वेंकटरमणी, सुवर्ण जन्ममहोत्सव मुख्य सल्लागार श्री. एम् चांद्रमौळीस्वरम आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार हेही उपस्थित होते.
सनातनच्या कार्यास माझे आशीर्वाद ! – श्री महास्वामीजी
“सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही धीरोदात्तपणे कार्य करत आहात, तुम्हा सर्वांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत. मी सनातन प्रभात कन्नड साप्ताहिक प्रत्येक वेळी वाचतो. तुमच्यावर किती आघात होत आहेत तरीही धर्मकार्य करणे चालूच आहे. मी रामनाथी आश्रमात एकदा येईन’’.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात