प.पू. देवबाबा यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास भेट
पनवेल – परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. तेच ईश्वरी राज्याची स्थापना करणार आहेत. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून सनातनचे साधक श्रीकृष्णाचे चित्र सप्तचक्रांवर उपायांसाठी लावतात, असे उद्गार कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी काढले. त्यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी देवद सनातनच्या येथील आश्रमाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सनातनचे ६५ टक्के पातळीचे साधक श्री. शिवाजी वटकर यांनी प.पू. देवबाबा यांचा शाल, श्रीफळ आणि प्रसाद देऊन सन्मान केला. सनातनचे साधक श्री. ॐकार कापशीकर यांनी त्यांना आश्रमातील कार्याविषयी अवगत केले. ‘‘आश्रम छान आहे’’, असे गौरवोद्गार त्यांनी आश्रमदर्शनाच्या वेळी काढले.
या वेळी त्यांनी ‘‘आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीत, तसेच ध्यानमंदिरातील सनातननिर्मित देवतांची चित्रे अन् श्री गणेशमूर्ती यांत चैतन्य आहे’’, असे सांगितले.
क्षणचित्रे
१. प.पू. देवबाबा यांना प्रसाद दिल्यावर त्यांनी तो उघडून साधकांना सर्व प्रसाद वाटला.
२. प.पू. देवबाबा यांना धर्मशिक्षण फलकांविषयी माहिती देत असतांना त्यांनी त्यांच्यासमवेत असलेल्या भक्तांना टिळा लावण्याचे महत्त्व सांगून त्यांनाही टिळा लावण्यास सांगितले.
या वेळी प.पू. पांडे महाराज यांच्याशी त्यांनी ॐकार, स्वर, संगीत आदी विषयांवर चर्चा केली. प.पू. पांडे महाराजांनी त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाले, ‘‘हे आत्म्याचे मीलन आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात