सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेल्या धर्मशिक्षणवर्गाला
गेल्यामुळे साधना समजणे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपामुळे
सहा मासांत पूर्वजांच्या त्रासातून मुक्त होऊन घरात प्रत्येक दिवस सणासारखा वाटणे
‘मी एक वर्षापासून आमच्या वाडीतील सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेल्या धर्मशिक्षणवर्गाला जात आहे. धर्मशिक्षणवर्गात सांगितल्याप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि श्री कुलदेवीची उपासना करण्यास आरंभ केला. आमच्या घरी पूर्वजांचा त्रास होता. माझ्या वडिलांना त्याचा अतिशय त्रास होत असे. ते अमावास्या आणि पौर्णिमा या काळात विचित्र वागत. आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्यामध्ये अतिशय भांडणे होत असत. ‘मी एवढा शिकूनही काही लाभ नाही’, असे मला वाटत असे. मी जन्मल्यापासून गेली २५ वर्षे आमच्या घरात एकही सण आनंदात गेला नव्हता. तेव्हा मला नेहमी वाटत असे, ‘घरात चांगले वातावरण कधी निर्माण होईल ?’; पण साधना कळल्यापासून त्रास पूर्णपणे नाहीसा झाला. सध्या आमच्या घरात प्रत्येक दिवस सणासारखाच असतो. मी श्रीकृष्णाच्या चरणी आणि प.पू. डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या २५ वर्षांत आम्हाला जे जमले नाही, ते साधना समजल्यामुळे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपामुळे साध्य झाले. सहा मासांत आम्ही या त्रासातून मुक्त झालो. ही अनुभूती प.पू. गुरुदेवांनीच माझ्याकडून लिहून घेतली. त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे.’
– श्री. प्रकाश कोंडसकर (धर्माभिमानी), उगवता लावगणवाडी, जिल्हा रत्नागिरी.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक