मुलांवर संस्कार होण्यासाठी सनातनचे ग्रंथ उपयुक्त असल्याचे मान्यवरांचे मत
लातूर – येथील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४ व्या वार्षिक अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शनाला महाराष्ट्रातील नामांकित वाचनालय प्रमुखांनी भेट देऊन त्यांच्या ग्रंथालयासाठी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ खरेदी करणार असल्याचे सांगितले.
नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव श्री. हंबीरे, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे आनंद चाटे, अमरावती विभागाचे ग्रंथालय संघाचे सदस्य सुनील वायाळ, नांदेड ग्रंथालय संघाचे संचालक सुरेश गोणेकर यांनी सनातच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ‘मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी सनातनचे ग्रंथ उपयुक्त आहेत’, असे गौरवोद्गार काढले. या समवेतच महाराष्ट्रातील अनेक विभागांच्या ग्रंथालय प्रमुखांनी ‘सनातनच्या ग्रंथाचे संच घेऊ’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात