१. शांत आणि प्रसन्न वाटणे
‘आश्रमात प्रवेश केल्यानंतर मला शांत आणि प्रसन्न वाटत होते. ध्यानमंदिरात गेल्यानंतर ‘पुष्कळ चैतन्य आणि शक्ती ग्रहण होत आहे’, असे जाणवले.’
– श्री. कृष्णा मसूरकर, गोवा (१६.१.२०१६)
२. स्वर्गलोकात असल्यासारखे वाटणे
‘आश्रमात आल्यानंतर मला सगळीकडे चैतन्य जाणवले. आश्रमातील साधकांना पाहिल्यावर ‘आम्ही खरंच स्वर्गलोकात आहोत का ?’, असे काही वेळ वाटले.’
– श्री. प्रकाश ना. नाईक, गोवा (१६.१.२०१६)
३. ध्यानमंदिरात पुष्कळ सात्त्विकता जाणवणे
‘मला आश्रम बघून प्रसन्न वाटले. ध्यानमंदिरात पुष्कळ सात्त्विकता जाणवली. उच्छिष्ट गणपति यज्ञातील मंत्रोच्चार ऐकून मनाला एक वेगळा आनंद मिळाला.’
– श्री. रूपेश अविनाश फणसेकर, ठाणे, महाराष्ट्र. (१६.१.२०१६)
४. आश्रमातील साधकांची निःस्वार्थी सेवा पाहून मला स्वतःमधील अहंकाराची कीव वाटली !
मी माझ्या आयुष्यात इतका आनंद कुणाच्याही तोंडवळ्यावर पाहिला नव्हता, एवढा आनंद मला आश्रमातील साधकांच्या तोंडवळ्यावर दिसून आला. सर्व साधकांची निःस्वार्थ सेवा पाहून माझ्यातील अहंकाराची मला कीव वाटत होती. इथून पुढे मी निःस्वार्थी रहाण्याचा प्रयत्न करीन.
– श्री. नवनाथ वसंत पाटील (१८.६.२०१७)
५. सनातनचा रामनाथी आश्रम पाहून आजी म्यां पृथ्वीवरी स्वर्ग पाहिला, असे मला वाटले !
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांचा सेवाभाव आणि प्रेमभाव पाहून अतिथी देवो भव हा मंत्र सार्थ ठरला, असे मला वाटले. आश्रमातील प्रत्येक वस्तू ईश्वरी चैतन्याने भारित झाली आहे, याची मला क्षणाक्षणाला जाणीव झाली. हे सर्व पाहून याची देही, याची डोळा आजी म्यां पृथ्वीवरी स्वर्ग पाहिला, असे मला वाटले.
– श्री. अमोल अशोक चेंडके (१८.६.२०१७)
६. असा आश्रम प्रत्येक शहरात असायला हवा !
‘रामनाथी आश्रमदर्शन करतांना आश्रमातील व्यवस्था अतिशय उच्च स्तरावरील असल्याचे मला जाणवले. माझी अशी इच्छा आहे की, अशा प्रकारचा आश्रम देशातील प्रत्येक शहरात असायला हवा.’ – श्री. बिंगनेश्वर दास, जिल्हाप्रमुख, विवेकानंद कार्य समिती, गजापती, ओडिशा. (३.६.२०१८)
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु
राष्ट्र स्थापनेच्या शुभसंकल्पाचा प्रसार केला पाहिजे !
‘रामनाथी आश्रम पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन मिळाले. ‘ते अधिकाधिक समजून घेऊन त्यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेचा शुभसंकल्पाचा प्रसार केला पाहिजे’, असे मला वाटते. ‘या आश्रमातून हिंदुत्वाचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा शुभ संकल्प सत्य व्हावा’, ही सदिच्छा !’ – श्री. महेंद्र कुमार, संस्कृती रक्षक संघ, देहली.
८. ‘आश्रम सर्वांगसुंदर, परिपूर्ण आणि पुण्यश्लोक व्यक्तींचा वास असलेले
स्थान असून आयुष्याचे परिवर्तन करणारे स्थान आहे’, असे मला जाणवले !
‘रामनाथी आश्रमातील सात्त्विकता माझ्या मनाला अतिशय आवडली. सात्त्विकतेमुळे माझे मन प्रसन्न झाले. ‘आयुष्यातील ६५ वर्षे गेल्यानंतर हा योग प्राप्त झाला’, याविषयी मला दुःख वाटते आणि ‘हा सुयोग एवढ्या उशिरा का होईना; पण जीवनात प्राप्त झाला’, याविषयी मला आनंद वाटतो. उर्वरित जीवनात साधना करण्याचा संकल्प मी आजच करतो. ‘आश्रम सर्वांगसुंदर, परिपूर्ण आणि पुण्यश्लोक व्यक्तींचा वास असलेले स्थान असून आयुष्याचे परिवर्तन करणारे स्थान आहे’, असे मला जाणवले.’ – श्री. पुरुषोत्तम रा. जोशी, संचालक, भगवान परशुराम प्रतिष्ठान, धुळे. (३.६.२०१८)
९. ‘रामनाथी आश्रम पहातांना मला वाटले, ‘भगवंताने दिलेला नैसर्गिकता आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम मी पहात आहे.’
१०. ‘आश्रम पाहून ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याची मला कल्पना आली.’ – श्री. आकाश यादव, कार्यवाहक, धर्मरक्षक, भोपाळ, मध्यप्रदेश. (३.६.२०१८)
११. सनातन संस्थेचे समाज आणि देश घडवण्याचे कार्य
ईश्वरनिर्मित असल्याकारणाने त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही !
‘सनातन म्हणजे सूर्याचा तेजस्वी लख्ख प्रकाश ! त्या प्रकाशात भारत देशातील सर्व जीव न्हाऊन निघो. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्मकार्य, तसेच देशकार्य असेच वृद्धींगत होवो’, हीच सदिच्छा ! सनातनचे समाज आणि देश घडवण्याचे कार्य ईश्वरनिर्मित असल्याकारणाने त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. या जन्मी माझा सनातन संस्थेला पूर्णपणे पाठिंबा आहे; पण ‘पुढील जन्मीसुद्धा सनातनच्या छत्राखाली यावे’, हीच माझी इच्छा आहे.’
– सौ. कविता अभय कर्णिक, डोंबिवली, ठाणे.
१२. सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय
प्रदर्शनातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू पाहून स्वतः अतिशय पावन झालो आहोत, असे वाटले !
सूक्ष्म जगताविषयी मी पवित्र दैनिक सनातन प्रभातमधून वाचले होते; परंतु त्या वेळी माझे मन साशंक होते. असे काही असू शकते, यावर माझा विश्वास नव्हता; पण सूक्ष्मातून आक्रमण झालेल्या वस्तू पाहून माझा त्यावर विश्वास बसला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू पाहून स्वतः अतिशय पावन झाल्याची भावना होत आहे.
– श्री. अमोल अशोक चेंडके (१८.६.२०१७)
१३. माझ्यात ईश्वराची सेवा करण्याची ओढ निर्माण झाली !
अ. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर माझे मन आपोआप शांत झालेे. आश्रमात फिरत असतांना मला प्रत्येक कक्षात एक वेगळी ऊर्जा जाणवली. माझे मन प्रसन्न झाले.
आ. आश्रमात अध्यात्म आणि राष्ट्र यांसंबंधी होत असलेले कार्य पाहून मी थक्क झालो. माझ्यात ईश्वराची सेवा करण्याची ओढ निर्माण झाली.
इ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून प्रथम मला भीती वाटली आणि मनात अनेक शंका उपस्थित झाल्या. नंतर माझ्या बर्याचशा शंकांचे निरसन झाले. मला सूक्ष्म जगताविषयी पुसटशी कल्पना आली.’
– श्री. अमित जोशी, रत्नागिरी, महाराष्ट्र.
‘आश्रमाच्या परिसरात आपोआप औदुंबराची रोपे उगवणे’, हे बुद्धीच्या पलीकडे आहे.’