विविध सणांचे औचित्य साधून आस्थापनातील (कंपनीतील) कर्मचारी, ग्राहक, परिचित व्यक्ती
आदींना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची भेट देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात योगदान देणारे व्यावसायिक !
‘सनातनचे ग्रंथ म्हणजे राष्ट्र, धर्म, साधना आदी विषयांवरील सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार ! वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म सांगणारे हे ग्रंथ वाचनीय आणि सार्वकालिक उपयुक्त ठरणारे आहेत. समाजातील अधिकाधिक जणांपर्यंत हे ग्रंथ पोहोचवणे, ही काळाची आवश्यकता आहे. भारतभरातील काही हितचिंतक विविध सणांच्या निमित्ताने नातेवाईक, परिचित, तसेच आस्थापनातील कर्मचारी यांना ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट स्वरूपात देऊन हे अमूल्य ग्रंथभांडार सर्वदूर पोहोचवत आहेत. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि लघुग्रंथ ग्राहकांना भेट म्हणून देणे
अ. इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील ‘भारतीय जीवन विमा निगम’च्या प्रतिनिधीने (एल.आय.सी. एजंटने) दीपावलीनिमित्त ग्राहकांना भेट म्हणून देण्यासाठी सनातनचे २,५०० लघुग्रंथ घेतले आहेत.
आ. धाराशीव येथील श्री. एकनाथराव भांगे हे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार आहेत. त्यांनी ‘श्री गणेश पूजाविधी’ हे १०० लघुग्रंथ खरेदी करून श्री गणेशचतुर्थीच्या काळात ग्राहकांना भेट स्वरूपात दिले.
२. आस्थापनातील कर्मचार्यांपर्यंत सनातनची ग्रंथसंपदा पोहोचवणे
अ. इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील २ कारखानदारांनी दीपावलीच्या निमित्ताने कर्मचार्यांना भेट स्वरूपात देण्यासाठी ५०० लघुग्रंथ विकत घेतले आहेत.
३. परिचितांना, तसेच उत्सवाच्या निमित्त समाजातील भाविकांना ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट स्वरूपात देणे
अ. चिंचवड (जि. पुणे) येथील काही वाचक आणि हितचिंतक यांनी ६,५०० लघुग्रंथ स्वतः विकत घेऊन श्री गणेशचतुर्थी, नवरात्री अन् दीपावली या निमित्ताने समाजात त्यांचे विनामूल्य वितरण केले.
आ. गोवा राज्यातील एक हितचिंतक ३ – ४ वर्षांपासून प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळात सनातनचे ५,००० लघुग्रंथ विकत घेऊन समाजातील परिचितांना भेट म्हणून देतात.
इ. पुणे येथील एका हितचिंतकांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने २,६२० लघुग्रंथ खरेदी करून त्यांचे वाटप केले.
ई. संभाजीनगर येथील एका धर्मप्रेमीने नवरात्रीच्या काळात ७०० लघुग्रंथ आणि २०० ग्रंथ खरेदी करून परिचितांमध्ये त्यांचे वितरण केले.
उ. सोलापूरातील एका धर्माभिमानी व्यक्तीने ६०० लघुग्रंथ खरेदी केले आणि श्री गणेशचतुर्थीच्या काळात परिचित व्यक्तींना ते वितरित केले.
४. हितचिंतकांनी ग्रंथ खरेदी करून ते वाचनालय, शाळा आदी सार्वजनिक ठिकाणी भेट देणे
अ. कराड (जि. सातारा) येथील एका व्यावसायिकाने सनातनने प्रकाशित केलेले सहस्रो रुपयांचे ग्रंथ खरेदी करून ते नगरपालिकेच्या वाचनालयाला भेट म्हणून दिले.
आ. रायगड जिल्ह्यातील एका हितचिंतकांनी १३,९०० रुपये किंमतीच्या ग्रंथांचे संच शाळेत भेट म्हणून दिले.
इ. चेन्नईतील एका व्यावसायिकाने ‘तमिळ’ भाषेतील ‘बोधकथा’ या विषयाचे १२,१०० रुपयांचे ग्रंथ विकत घेतले आणि एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला भेट म्हणून दिले. ही संघटना त्यांच्या विद्यालयातील शिक्षकांना हे ग्रंथ देणार आहे.
ई. कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील एका हितचिंतकाने एका ग्रंथालयाला ८,६०० रुपयांचे ग्रंथ भेट स्वरूपात दिले.
उ. जागमाता (जि. ठाणे) येथील ३ वाचकांनी ३,५०० रुपयांचे ग्रंथ प्रायोजित केले आणि ते वाचनालय अन् शाळा या ठिकाणी भेट दिले.
ऊ. सांगोला (जि. सोलापूर) येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीने सनातनच्या बालसंस्कार मालिकेतील काही ग्रंथ खरेदी केले आणि १५ ऑगस्ट या दिवशी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ते पारितोषिक म्हणून दिले.
५. समाजातील घटकांपर्यंत सनातनचे ग्रंथ पोहोचावेत, यांसाठी प्रयत्न करणारे हितचिंतक !
अ. ठाणे जिल्ह्यातील ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने ठाणे, दापोली आणि राजापूर येथील त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांना ग्रंथातील ज्ञानाचा लाभ व्हावा, यासाठी सनातनचे ३० सहस्र रुपयांपर्यंतचे ग्रंथ विकत घेतले आहेत.
आ. गोरेगाव, मुंबई येथील एका जिज्ञासूने १०,००० रुपये, एका धर्मप्रेमीने २७,००० रुपये आणि एका हितचिंतकाने ४,५०० रुपये एवढी रक्कम ग्रंथालयासाठी ग्रंथ विकत घेण्याकरता दिली.
या हितचिंतकांनी त्यांच्या व्यावसायिक व्यस्ततेतही राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी स्वतःच्या परीने योगदान दिले आहे. ही अत्यंत कौतुकास्पद अन् प्रेरणादायी गोष्ट असून इतर धर्मप्रेमींसाठीही ती अनुकरणीय आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात