कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात वसलेले कुरवपूर हे अतिशय जागृत तीर्थक्षेत्र ! कृष्णा नदीने वेढलेल्या या निसर्गरम्य बेटावर श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी १४ वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या अवतार कार्याच्या समाप्तीनंतर ते लुप्त झाले.
श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना श्रीक्षेत्र कुरवपूर येथेच ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभदिगंबरा ।’ या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. येथेच पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभ यांचा साक्षात्कार झाला.
सर्वजगद्रक्षाय गुरुदत्तात्रेयायश्रीपादश्रीवल्लभपरमात्मने नम: ।


