दिवाळीच्या दिवशी पूर्ण घरात दिवे लावावे कि पूर्ण घराभोवतीही दिवे लावावे ?
दिवाळीच्या दिवशी पूर्ण घरात दिवे लावण्याची, तसेच पूर्ण घराभोवती दिवे लावण्याची आवश्यकता नसते. प्रवेशद्वाराशी आणि मागे दार असेल, तर मागच्या द्वाराशी दोन्ही बाजूला दोन दिवे लावावेत अन् घरात देवघराच्या ठिकाणी दिवा लावावा. प्रवेशद्वाराच्या किंवा क्वचित् प्रसंगी मागच्या द्वारातून वास्तूत व्यक्तींची ये-जा होत असल्याने त्यांच्याबरोबर घरात येणार्या त्रासदायक स्पंदनांचे दिव्यांच्या ज्योतीतून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वात्मक लहरींनी उच्चाटन होते, तसेच बाह्य वायूमंडल आणि वास्तूही शुद्ध होण्यास साहाय्य होते. तेजाचे प्रसारण सूक्ष्म स्तरावर मर्यादित क्षेत्रात वेगाने होत असल्याने संपूर्ण घरात, तसेच घराभोवती दिवे लावण्याची आवश्यकता नाही.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ