अनुक्रमणिका
१. हिंदु धर्मशास्त्राने विशद केलेले गायीचे महत्त्व
‘हिंदु धर्मशास्त्राने गाय, नदी आणि भारतभूमी यांना ‘देवी’ संबोधून त्यांना मातेचे स्थान दिलेे आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूसाठी गोमाता पूजनीय आहे.
२. आध्यात्मिकदृष्ट्या गायीचे महत्त्व
अ. सर्व प्राण्यांमध्ये गाय हा सर्वांत सात्त्विक प्राणी आहे.
आ. गोमातेच्या देहातील विविध ठिकाणी विविध देवतांचा सूक्ष्मातून वास आहे. गोमातेमध्ये ३३ कोटी देवतांची तत्त्वे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याचे सामर्थ्य आहे.
इ. गोमातेचे दूध, गोमय आणि गोमूत्र हे तिन्ही अतिशय सात्त्विक अन् चैतन्यमय असल्यामुळे त्यांपासून पंचगव्य (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय यांचे एकत्रीकरण) बनवले जाते. पंचगव्य प्राशन केल्यामुळे पिंडाची शुद्धी होते. त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये पंचगव्याचा उपयोग केला जातो.
ई. गोमातेच्या अस्तित्वामुळे भूमी आणि वायूमंडल यांची शुद्धी होते.
३. गोवंशाच्या हत्येचे होणारे दुष्परिणाम
अ. भूतलावरील सात्त्विकता वृद्धींगत करणार्या सात्त्विक प्राण्याची हत्या केल्यामुळे भूतलाची सात्त्विकता उणावते. त्यामुळे गोमातेची हत्या करणार्या व्यक्तीला समष्टी पाप लागते.
आ. गोमातेची हत्या करणार्या व्यक्तीची अधोगती होऊन तिला मृत्यूनंतर पाचव्या नरकात शिक्षा भोगावी लागते. (टीप)
इ. गोमातेच्या हत्येला अप्रत्यक्ष साहाय्य करणारे, उदा. वृद्ध झालेल्या गोमातांना कसायांना विकणारे आणि गोमातेच्या हत्येसंदर्भात मूकसंमतीदार असणारे, उदा. गोमातांना वाहनांत कोंबून पशूवधगृहाकडे नेत असल्याचे पाहूनही त्याविषयी काहीही न करणारे हेही महापापी ठरतात. (टीप)
ई. गोमांस भक्षण करणारा मनुष्य महापापी असून त्याला पुढील जन्म असुर योनीत मिळतो. (टीप)
४. गोमातेची सेवा करणार्यांना मिळणारे फळ
गोमातेचे पूजन आणि गोमातेची मनोभावे सेवा करणार्यांना गोमातेचे कृपाशीर्वाद मिळतात आणि त्यांना पुष्कळ प्रमाणात पुण्य लाभते. या पुण्यबळावर त्यांना मृत्यूनंतर देवलोकात निवास करण्याची संधी मिळते. (टीप)
५. गोमातेचे रक्षण करणार्यांना मिळणारे फळ
गोमातेचे रक्षण करणार्या व्यक्तीला सलोक मुक्तीची प्राप्ती होते (टीप) आणि तिला विविध देवतांचे कृपाशीर्वाद लाभतात.’
टीप – सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.६.२०१७)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’ च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
६. गो-प्रदक्षिणा
गवां दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्याच्चैव प्रदक्षिणम् ।
प्रदक्षिणीकृता तेन सप्तद्वीपा वसुन्धरा ।।
– गोसावित्रीस्तोत्र, श्लोक १३
अर्थ : गोमातेचे दर्शन घेतल्यावर तिला नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे सात द्वीपे (टीप) असलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळते.
टीप : ‘जम्बु, कुश, प्लक्ष, क्रौंच, शाल्मलि, शाक आणि पुष्कर या सात द्वीपांमध्ये पृथ्वी विभागली आहे’, असे वर्णन पुराणांत आढळते. (सध्याच्या पृथ्वीचे खंड – आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक)
मातरः सर्वभूतानां गाव: सर्वसुखप्रदाः ।
वृद्धिमाकाङ्क्षता नित्यं गावः कार्याः प्रदक्षिणा ।।
– महाभारत, पर्व १३, अध्याय ६८, श्लोक ७
अर्थ : सर्व सुखे प्रदान करणार्या गायी सर्व प्राणिमात्रांच्या माता आहेत. स्वतःच्या प्रगतीची इच्छा करणार्या मनुष्यांनी नेहमी गोमातांना प्रदक्षिणा घालावी.
– (साभार : मासिक ‘कल्याण’, नोव्हेंबर २०२१)
गोमातेचे महत्त्व ज्ञात नसलेले आणि गायींना खाटीकखान्यात पाठवणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे हिंदु शासनकर्ते केवळ जन्महिंदू आहेत, कर्महिंदू नव्हेत. याचे फळ त्यांना भोगावे लागेल.