सनातनचा आश्रम दैवी शक्तीचा स्रोत आहे ! – श्री. पी. पद्मनाभ भट, इंदूर, तेलंगण

श्री. पी. पद्मनाभ भट यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

डावीकडून श्री. मनोज खाडये, श्री. प्रवीण ठाकूर, सौ. राजश्री ठाकूर, श्री. आकाश, कु. गंगाभवानी, श्री. प्रदीप सावंत, श्री. प्रकाश कोरगावकर, श्री. रूपेश खाडये, तसेच बसलेले श्री. पद्मनाभ भट आणि सौ. राजमणी भट.

रामनाथी, गोवा (वार्ता.) : आश्रमात अतिशय दैवी शक्ती जाणवली. या दैवी शक्तीमुळे येथे चमत्कार घडतांना मी पाहू शकतो. नोव्हेंबर २०१७ नंतर या आश्रमाला अधिक गती प्राप्त होईल. आश्रमाचे कार्य झपाट्याने वाढेल आणि त्याची ख्याती दूरवर पसरेल. हा आश्रम म्हणजे दैवी शक्तीचा स्रोत आहे, असे उद्गार इंदूर (तेलंगण) येथील मास्टर सी.व्ही.व्ही. मेडिटेशन सेंटरचे गुरुजी श्री. पी. पद्मनाभ भट यांनी काढले. त्यांनी २५ सप्टेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी वरील उद्गार काढले. सनातनचे श्री. सागर निंबाळकर यांनी श्री. भट यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. सनातन संस्थेचे कार्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. श्री. भट यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी सौ. राजमणी भट, त्यांचे भक्त ठाणे येथील प्लेसमेंट कन्सल्टंंट श्री. प्रदीप व्ही. सावंत, व्यावसायिक श्री. प्रवीण ठाकूर, त्यांच्या पत्नी सौ. राजश्री ठाकूर, तसेच कणकवली येथील श्री. मिलींद खाडये उपस्थित होते.

श्री. भट पुढे म्हणाले, ही वास्तू अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकी आहे. येथील साधक शिस्तबद्ध आहेत. त्यांचा त्याग आणि समर्पित वृत्ती पाहून मी भारावून गेलो आहे. प.पू. भक्तराज महाराज हे चौदाव्या शतकातील सिद्धपुरुष होते आणि ते भगवान शिवाचे अंशावतार होते. प.पू. भक्तराज महाराज सध्या कैलास पर्वतावर वास्तव्य करतात. सध्याचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे आध्यात्मातील पुष्कळ मोठे अधिकारी आहेत. त्यांच्याप्रती मी आदर व्यक्त करतो. या संस्थेची झपाट्याने वाढ होईल. मी सर्वांना शुभेच्छा देतो.

 

सनातन संस्थेचे हिंदु धर्म प्रसाराचे कार्य पाहून अभिमान वाटतो ! – श्री. प्रदीप व्ही. सावंत

सनातन संस्थेचे हिंदु धर्म प्रसाराचे कार्य पाहून अभिमान वाटतो. सनातन संस्था हिंदु धर्मासाठी करत असलेले कार्य पाहून मी प्रभावित झालो. साधकांमधील शिस्त, त्याग आणि ते समर्पित भावाने करत असलेली सेवा पाहून मी भारावून गेलो आहे. सनातनच्या या आश्रमासाठी मीही योगदान देईल.

 

सनातन संस्था हिंदु धर्मासाठी करत असलेले कार्य अत्यावश्यक ! – श्री. प्रवीण ठाकूर

सनातनच्या आश्रमातील शिस्त, साधकांचा प्रेमभाव आणि नियोजनबद्धता या गोष्टी आवडल्या. सनातन संस्था हिंदु धर्मासाठी करत असलेले कार्य अत्यावश्यक आहे. अशा कार्यामध्ये माझ्या परीने योगदान देण्याचा मी प्रयत्न करीन.

 

सनातन अतुलनीय कार्य करत आहे ! – श्री. मिलिंद खाडये

सनातन आपल्या हिंदु धर्माचा अतिशय आदरपूर्वक प्रसार-प्रचार करत आहे. येथे दैनंदिन व्यवहार, धर्माचरण कसे करावे ? याविषयी माहिती सांगितली जाते. यासमवेतच आध्यात्मिक संशोधन, साधना आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास यांविषयी अतुलनीय, अवर्णनीय असे कार्य सनातन करत आहे. त्याविषयी मानाचा मुजरा !

 

सूूक्ष्मातून जाणण्याची क्षमता असलेले आणि जनकल्याणास्तव अनिष्ट शक्तींच्या
त्रासावर उपाय करणारे निझामाबाद, तेलंगण येथील श्री. पी. पद्मनाभ भट यांची रामनाथी आश्रमभेट !

१. श्री. पी. पद्मनाभ भट यांचा परिचय

श्री. पी. पद्मनाभ भट हे कारागृहात टंकलेखक (टायपिस्ट) म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर १० वर्षे व्यष्टी साधना आणि ध्यानधारणा केली. त्यानंतर गुरूंनी त्यांना आदेश दिला, तुझी सकारात्मक शक्ती जनकल्याणासाठी वापर. त्यानंतर ते समाजासाठी उपाय म्हणून विभूती देणे, अनिष्ट शक्ती काढून टाकणे आदी सर्व विनामूल्य करतात. कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, यावर त्यांची श्रद्धा आहे.

 

२. श्री. पी. पद्मनाभ भट यांच्या उपायांमध्ये महामृत्यूयोग टाळण्याचीही क्षमता असणे

श्री. पी. पद्मनाभ भट यांनी सांगितले, इतरांवर उपाय करतांना माझी सकारात्मक शक्ती ५० टक्के साहाय्यक ठरते, तर ५० टक्के संबंधित व्यक्तीचे साधनेतील प्रयत्न आवश्यक असतात. महामृत्यूयोग असला, तरी आम्ही केलेल्या उपायांनी तो पालटू शकतो.

 

३. आश्रमदर्शनाच्या वेळी श्री. पी. पद्मनाभ भट यांनी सनातनविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

३ अ. सनातनच्या आश्रमात पुष्कळ सकारात्मक शक्ती आहे. तसेच आश्रमाभोवती अनिष्ट शक्तीही फिरत आहेत.

३ आ. संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक हे काही जन्मांपूर्वीचे परस्परांचे नातेवाइक असणे (रामनाथी आश्रमात औदुंबर रोपे आपोआप उगवण्याचे कारण) : रामनाथी आश्रमात ध्यानमंदिराच्या शेजारी असलेल्या यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची पुष्कळ रोपे आपोआप उगवली आहेत. यामागचेे कारण सांगतांना ते म्हणाले, तीन जन्मांपूर्वी संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हे वडील अन् मुलगा होते. तेव्हा त्यांनी या ठिकाणी बसून दत्तोपासना केली होती. त्यामुळेच येथे आश्रमाची निर्मिती झाली आहे. आश्रमातील सर्व साधक आणि परात्पर गुरुदेव काही जन्मांपूर्वीचे परस्परांचे नातेवाइक आहेत.

३ इ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन : सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पहातांना अनिष्ट शक्तींचे दृश्य परिणाम पाहून श्री. पद्मनाभ म्हणाले, याच अनिष्ट शक्तींच्या निर्मूलनासाठी आम्हीही प्रयत्न करतो.

३ ई. श्रीकृष्णाच्या डोळ्यांतून आसमंतात सकारात्मक (दैवी) शक्ती प्रक्षेपित होणे : आश्रमाच्या स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र पाहिल्यावर श्री. पद्मनाभ म्हणाले, श्रीकृष्णाच्या डोळ्यांतून आसमंतात सकारात्मक (दैवी) शक्ती प्रक्षेपित होत आहे. एखाद्या रुग्णाने प्रतिदिन १५ मिनिटे श्रीकृष्णाच्या चित्रासमोर आलंबन केले, तरी त्याचे रोग दूर होऊ शकतात.

३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेले वाहन : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या गाडीत बसल्यावर श्री. पी. पद्मनाभ म्हणाले, या वाहनात पुष्कळ दैवी शक्ती आहे. ती साधनेला पोषक आहे.

३ ऊ. पू. सौरभदादांविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे ! : पू. सौरभदादांच्या खोलीत जाऊन श्री. भट यांनी त्यांची भेट घेतली. पू. दादांना पाहिल्यावर त्यांनी स्वतःचा हात पाहून पू. दादांविषयी पुढील सूत्रे सांगितली, त्यांनी सात जन्मांपूर्वी, म्हणजे सुमारे ७०० – ७५० वर्षांपूर्वी केलेल्या चुकीचे प्रारब्ध ते भोगत आहेत. मी त्यांच्यासाठी विभूती देतो. ती त्यांच्या गळ्याला लावून प्रतिदिन पाण्यातून द्या. ६ मासांनी याचा कोणता परिणाम होतो, ते पहा. पू. सौरभदादा यांना ८५ वर्षे आयुष्य आहे.

३ ए. ऑगस्ट २०१८ नंतर दीड मास सनातनला त्रासदायक असणे आणि कुणीतरी आश्रम पहायला येऊन विश्‍वासघात करणार असणे : पुढच्या वर्षी श्रावण मासानंतर, म्हणजे ऑगस्ट २०१८ नंतर दीड मास सनातनला त्रासदायक आहे. अनिष्ट शक्ती सनातनच्या कार्यात अडथळे आणतील. आश्रमालाही ते त्रासदायक ठरू शकते. ऑगस्ट २०१८ नंतरच्या आश्रमावरील अनिष्ट शक्तींच्या आक्रमणाविषयी ते म्हणाले, कुणीतरी आश्रम पहायला येऊन विश्‍वासघात करू शकतो.

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

४. श्री. पी. पद्मनाभ भट यांनी सनातनचे वाईट शक्तींवरील
संशोधन आणि आश्रमव्यवस्था यांविषयी काढलेले कौतुकोद्गार

४ अ. अनिष्ट शक्तींवर उपाय करण्याच्या संदर्भात सेवा करण्याची सिद्धता दर्शवणे : श्री. पी. पद्मनाभ भट यांनी २६.९.२०१७ या दिवशी वाईट शक्तींच्या संशोधनाविषयी कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले, वातावरणातील अनिष्ट शक्तींच्या विरोधात गुरूंच्या आज्ञेने आम्हीही सूक्ष्मातून लढा देत आहोत. या संदर्भात मला काही सेवा उपलब्ध झाल्यास सांगा. तुम्ही सांगाल, तेव्हा मी रामनाथी आश्रमात येईन किंवा आपण माझ्याकडे आलात, तरी आपले स्वागत आहे.

४ आ. शिस्तबद्ध आणि सेवाभावी आश्रमव्यवस्था : आश्रम-व्यवस्थेविषयी बोलतांना ते म्हणाले, इतकी शिस्तबद्ध आणि सेवाभावी व्यवस्था असू शकते, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. आमच्या आश्रमात हे सर्व चालू करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे.

इथल्या आदरातिथ्याविषयी मी आपल्या सर्वांप्रती कृतज्ञ आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

– श्री. मनोज खाडये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment