श्रेष्ठ जीव असणारी गोमाता ही अघ्न्या (अवध्य) आहे !

Article also available in :

गायीचे रक्षण केवळ घोषणांनी होणार नाही, त्यासाठी ठोस उपाययोजना हवी !

 

१. संस्कृतच्या व्याकरणाचे सखोल ज्ञान नसल्यामुळे किंवा निहित स्वार्थामुळे विदेशी टीकाकारांनी
वेदादी ग्रंथांचे अनेक प्रकारे भ्रम निर्माण करणारे आणि सनातन भारतीय परंपरेत न बसणारे भाष्य केले असणे

‘मुळात वेदापासून निर्माण झालेल्या आणि मानवाची सर्वप्रथम अन् पूर्णपणे वैज्ञानिक भाषा असलेल्या संस्कृतच्या शब्दांत सर्व अक्षरांचा धात्वार्थ समाविष्ट केलेला असतो. त्यामुळे एका शब्दाचे अनेक अर्थ होतात आणि एखाद्या विशेष शब्दाचा अर्थ हा प्रसंग किंवा वाक्याचा भावार्थ यांवर अवलंबून असतो. कालांतराने काही शब्दांसाठी विशिष्ट अर्थ हे भाषेत निश्‍चित करण्यात आले. त्यांना रूढ अर्थ म्हणतात, जसे अश्‍वः शब्दाच्या मूळ अर्थात् – वेगाने जाणार्‍या अनेक वस्तू असू शकतात; परंतु हा अश्‍वः हा शब्द सामान्यपणे घोडा या प्राण्यासाठी रूढ झाला आहे. त्याच पद्धतीने गो = गौ या शब्दाच्या अर्थाचा विचार करायचा झाल्यास शब्दकोश असे सांगतो की, ‘गच्छति इति गोः ।’ या दृष्टीने ‘गो’ हा शब्द पृथ्वी, सरस्वती, वेदवाणी, इंद्रिये, रत्ने इत्यादींसाठीही वापरला जातो. जसे गोस्वामी म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवले आहे, तो गोस्वामी होय. संस्कृतच्या व्याकरणाचे सखोल ज्ञान नसल्यामुळे किंवा निहित स्वार्थामुळे विदेशी टीकाकारांनी वेदादी ग्रंथांचे अनेक प्रकारे भ्रम निर्माण करणारे आणि सनातन भारतीय परंपरेत न बसणारे भाष्य केले आहे. उदा. ‘ऋषीमुनी हे गोमांस भक्षण करत होते’, असे त्यांनी सांगितले आहे. हे अज्ञानजन्य आणि धूर्तपणाचे आहे.

 

२. बहुपयोगी असणारी गोमाता !

मुळात गोमाता बहुपयोगी आहे. केवळ एवढेच नव्हे, तर आताच्या वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला आहे. भारतीय वेदादी ग्रंथांच्या आधारे तर ‘गायीला पृथ्वीला धारण करणारी शक्ती’, असे मानले गेले आहे.

गोभिर्विप्रैश्‍च वेदैश्‍च सतीभिः सत्यवादिभिः ।

अलुब्धैर्दानशीलैश्‍च सप्तभिर्धार्यते मही ॥

(संदर्भ : स्कंदपुराण, खंड १, अध्याय २, श्‍लोक ७१)

अर्थ : गाय, वेदपाठक, वेदांचे उदात्त शिक्षण, सती आणि साध्वी अशा स्त्रिया, सत्यवादी, निर्लोभी आणि सात्त्विक दानी माणसे या ७ जणांच्या आधारावरच ही पृथ्वी टिकून राहिली आहे.

 

३. गाय हा एक श्रेष्ठ जीव असून ती अवध्य असणे

गाय हा एक श्रेष्ठ जीव आहे, जिला भारतीय पशू म्हणत नाहीत, तर ते तिला ‘गोमाता’ म्हणून तिच्याविषयीचा आपला आदर व्यक्त करतात. अशी ही गाय कधीही वध करण्यायोग्य असू शकत नाही. गोमाता ही अघ्न्या (अवध्य) आहे.’’

(संदर्भ : ‘गीता स्वाध्याय’, नोव्हेंबर २००७)

 

४. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी तत्कालीन नेत्यांनी नव्या गुरुकुलांमधून संस्कृत शिक्षणाची सोय केली असणे

‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी नेत्यांनी संस्कृत आणि हिंदी भाषा, तसेच गोमाता अन् भारतीय संस्कृती यांना वाचवण्यासाठी व्याख्याने देऊन जनभावनेला या स्वातंत्र्यलढ्याशी जोडले होते. केवळ एवढेच नव्हे, तर तत्कालीन नेत्यांनी या दिशेने उपलब्ध साधनांच्या आधारे काही व्यावहारिक उपायही केले होते. रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या ‘विश्‍वभारती विश्‍वविद्यालय’, मदनमोहन मालवीय यांनी स्थापन केलेले ‘काशी हिंदू विश्‍वविद्यालय’, हिंदी साहित्य संमेलन आणि अनेक राज्यांमधील हिंदी प्रचारसभा आणि गोसेवा संस्था इत्यादींनी नव्या गुरुकुलांमधून संस्कृत शिक्षणाची सोय केली होती.

 

५. स्वातंत्र्यानंतर संस्कृत, संस्कृती आणि हिंदी भाषा यांची उपेक्षा होऊन भारतीय गायींच्या प्रजातीला दूषित केले जाणे

देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होणे अपेक्षित होते; पण असे झाले नाही. संस्कृत, संस्कृती आणि हिंदी भाषा यांची उपेक्षाच झाली, असे नाही, तर भारतात विदेशी गायी आयात केल्या गेल्या आणि भारतीय गायींची विदेशी बैलांशी गर्भधारणा करवून भारतातील शुद्ध वैज्ञानिक आधारावर श्रेष्ठ असणार्‍या प्रजातीला दूषित केले गेले.

 

६. आता जगातील समृद्ध दुग्ध उद्योगांमध्ये भारतीय गायीचे आरोग्याच्या
दृष्टीने श्रेष्ठत्व सिद्ध झाल्याने गोरक्षणाच्या प्रयत्नांना गती देणे आवश्यक असणे

आता जगातील समृद्ध दुग्ध उद्योगांमध्ये भारतीय गायीचे आरोग्याच्या दृष्टीने श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रासह स्वयंसेवी संस्था अणि साधु-संताचे आश्रम यांच्याकडून भारतीय गायींना आर्थिक दृष्टीने लाभदायक करण्याच्या योजनांना गती दिली पाहिजे. केवळ घोषणा देणे आणि कार्यक्रम करणे हे पुरेसे नाही.’

 

७. गोरक्षणासाठी सुचवण्यात आलेले काही उपाय

अ. ‘विदेशी गायीच्या विदेशी प्रजातींचे दूध हे वैज्ञानिकांकडून रोग निर्माण करणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रजननावर बंदी आणण्यासाठी उपाय केले पाहिजेत.

आ. लहान मुलांसाठी केवळ देशी गायीचे दूध हे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य केले पाहिजे; कारण विदेशी गायींच्या दुधामुळे मुलांमध्ये ‘इन्सुलिन’ आधारित मधुमेह हा रोग साथीच्या रोगांसारखा पसरत आहे.

इ. पंडित आणि कर्मकांड करणारे पुरोहित यांच्याकडून केल्या जाणार्‍या पूजांमध्ये, तसेच यज्ञ आणि हवन यांमध्ये देशी गायीचे दूध आणि तूप यांचाच उपयोग करणे आवश्यत आहे.

ई. देशी गायीचे दूध साठवण्यासाठी शासकीय डेअरीत स्वतंत्र व्यवस्था करावी.

उ. गोमूत्र आणि गोमय यांच्यापासून विविध उत्पादने सिद्ध करण्यासाठी गावांमधून व्यावसायिक आधारावर उद्योग स्थापन केले पाहिजेत. या उद्योगांना काही वर्षे अनुदान देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे की, ज्यामुळे दूध न देणार्‍या गायी, बैल आणि वासरे यांना मोकाट फिरावे लागणार नाही.

ऊ. लहान स्वरूपातील शेती आणि गावात साहित्याची ने-आण करण्यासाठी बैलांचा वापर करावा.

ए. सामूहिक आणि शासकीय गोपालनाला बळ देण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्था यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

ऐ. पशूवैद्यकीय महाविद्यालयांमधून देशी गायींवर आधारित विशेष अभ्यासक्रम चालू करावा.

ओ. कृषी महाविद्यालयांमध्ये गो-आधारित अनिवार्य शिक्षण आणि शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा चालू केल्या पाहिजेत.

औ. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांसाठी दिले जाणारे अनुदान बंद करून त्या अनुदानाचा वापर गोपालन, गोसंवर्धन आणि जैविक खते यांसाठी करावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment