चतु:श्रृंगी मंदिर (पुणे) येथे सनातनचे भव्य प्रदर्शन !

पुणे : प्रतिवर्षीप्रमाणे येथील जागृत देवस्थान असलेल्या चतु:श्रृृंंगी देवी मंदिराच्या प्रांगणात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे भव्य ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. २९ सप्टेंबरपर्यंत सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन भाविकांसाठी खुले असून अधिकाधिक जणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये धर्म-अध्यात्म, आचारधर्म, बालसंस्कार आदी धर्मशिक्षणविषयक ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच उदबत्ती, कापूर, अत्तर, उटणे, जपमाळ आदी पूजोपयोगी आणि नित्योपयोगी वस्तूही उपलब्ध आहेत. देवीची ओटी कशी भरावी, दसरा कसा साजरा करावा, कुंकूमार्चन करण्याचे महत्त्व, नवरात्रीत दीपप्रज्वलन का करावे अशी माहिती देणारे धर्मशिक्षणविषयक फलकही प्रदर्शनस्थळी लावण्यात आले आहेत. वर्ष २०१८ चे सनातन पंचाग (दिनदर्शिका) उपलब्ध असून भाविकांची त्याला विशेष मागणी आहे.

प्रखर धर्माभिमानी श्री. शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन

प्रखर धर्माभिमानी श्री. शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांच्यासह श्री. माऊली जगताप उपस्थित होते. श्री. शंकरशेठ जगताप हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आहेत. धर्मप्रसाराची संधी वारंवार मिळू दे, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

Leave a Comment