वणी (जिल्हा यवतमाळ) : येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी तहसील चौक, वणी येथे १६ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच ‘मोहरम’च्या निमित्ताने प्रतीवर्षी श्री दुर्गा विसर्जनावर बंदी घालून हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याची गळचेपी करणारे ममता सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनासाठी सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आंदोलनानंतर उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार चांदेकर यांना स्वाक्षर्यांचे निवेदन केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठवण्यासाठी देण्यात आले.
यवतमाळ येथेही आंदोलन
यवतमाळ येथेही वरील विषयांच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसह नवशक्ति दुर्गा उत्सव मंडळाचे श्री. अनिल शर्मा आणि कालिंका माता मंदिराचे श्री. राजेश श्रीवास उपस्थित होते. ३५० हून अधिक धर्माभिमान्यांनी स्वाक्षर्या करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.