जळगाव : प्रत्येकाने श्राद्धविधी करणे आवश्यक आहे. या संदर्भात बुद्धीप्रामाण्यवाद्यांकडून अनेक मतभेद पसरवले जातात, उदा. गरिबांना अन्नदान करणे. या सारख्या गोष्टींना बळी पडू नये. त्यांना धर्मशास्त्र जाणूनच घ्यायचे नसते केवळ हिंदूंच्या सणाला विरोध करणे, हेच त्यांचे लक्ष असते. धर्मशास्त्राचे पालन करून अनुभूती घेता आली पाहिजे. श्राद्ध हे तिथीनुसारच करायला हवे. हे विधी आपल्या कुवतीप्रमाणे केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सुखसमद्धी लाभते, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते येथील अयोध्यानगर भागातील बालाजी गणेश मंडळाच्या वतीने ‘पितृपक्षातील महालय श्राद्ध’ या विषयावर ३ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या प्रवचनात बोलत होते. या वेळी त्यांनी तर्पण कसे करावे, भरणी श्राद्धाचे महत्त्व, पितरदोषामुळे कोणते त्रास होतात, त्याचे निवारण कसे करावे, तसेच पितृपंधरवाड्यातील ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व त्यांनी या वेळी सांगितले.
या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी पितृपक्षातील शंकाचे निरसन करून घेतले. सनातन संस्थचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ या वेळी उपस्थितांनी घेतला. या व्याख्यानाला ५० जिज्ञासू उपस्थित होते.