गणेशोत्सव आणि गणपतीविषयक सर्व ग्रंथांना समाजातून मोठ्या प्रमाणात मागणी !
पुणे/पिंपरी-चिंचवड : सनातन संस्थेने गणेशोत्सव आणि गणपति यांविषयीचे धर्मशास्त्र सांगणारे, तसेच अध्यात्मशास्त्रीय माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. गणेशोत्सवानिमित्त या सर्वच ग्रंथांना समाजातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणेशोत्सव मंडळे आणि अन्य ठिकाणी या ग्रंथांचे घाऊक वाटप केले जात असून यामुळे हिंदूंपर्यंत धर्मशास्त्र पोहोचत आहे. बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने गणेशोत्सव कालावधीत ग्रंथांमध्ये असलेल्या आणि चिरकाल टिकणार्या ज्ञानाच्या माध्यमातून समष्टी प्रसारही होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे ग्रंथांना मिळालेला प्रतिसाद वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पिंपरी, चिंचवड अर्थ समजून घेऊन अथर्वशीर्षाचे पठण !
गणेशभक्त इंद्रायणीनगर येथील समता विकास गणेश मंडळाचे श्री. जाधव आणि श्रीमती कांबळे हे गणेशोत्सवाच्या काळात मंडळात येऊन अथर्वशीर्ष पठण करणार्यांना प्रतीवर्षी अथर्वशीर्षाच्या छायांकित प्रती द्यायचे. सनातनच्या साधिका सौ. संगीता पाटील यांनी त्यांना ‘अर्थ जाणून पठण केले, तर गणेशभक्तांना त्याचा अधिक लाभ होऊ शकतो’, असे सांगितल्यावर त्यांनी भाविकांना भेट देण्यासाठी सनातन-निर्मित ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष (अर्थासह)’ या लघुग्रंथाच्या प्रती घेतल्या. ‘‘अर्थ समजून घेऊन अथर्वशीर्ष पठण केल्यामुळे आनंद मिळत आहे’’, असे गणेशभक्त आणि महिला यांनी सांगितले.
भेटवस्तू देण्याऐवजी सात्त्विक ग्रंथ
भेट दिल्याने घराघरात धर्मशिक्षण जाईल ! – तुषार साने
भोसरी येथील हनुमान गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. तुषार साने यांनी गणेश मंडळामध्ये आरतीच्या वेळी येणार्या प्रतिष्ठित मान्यवरांना देण्यासाठी ‘श्री गणपति अथर्वशीर्ष (अर्थासह)’ आणि ‘श्री गणेश पूजाविधी’ हे लघुग्रंथ घेतले. ‘‘अन्य वस्तू भेट देण्यापेक्षा हे सात्त्विक ग्रंथ भेट दिल्याने घराघरात धर्मशिक्षण जाईल’’, असे ते या वेळी म्हणाले.
वाढदिवशी धर्मशिक्षण विषयक ग्रंथ भेट देणार्या सौ. माधुरी मामेडवार
इंद्रायणीनगर येथील सौ. माधुरी मामेडवार या वैष्णवी बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. गणेशोत्सवाच्या काळात २७ ऑगस्ट यादिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना सनातनचे ‘श्री गणेश पूजाविधी’, ‘आरतीसंग्रह’, ‘स्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र’ हे ग्रंथ भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
गणेशमूर्ती विक्रेत्यांनी ग्राहकांना सनातनचे लघुग्रंथ भेट दिले !
१. धर्माभिमानी साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. बेळगांवकर यांच्या गणेशमूर्ती विक्री कक्षावरून गणेशमूर्ती खरेदी करणार्या गणेशभक्तांना सनातनचा ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी’ हा ग्रंथ भेट दिला. ‘‘या ग्रंथाच्या माध्यमातून प्रत्येक गणेशभक्ताला शास्त्रानुसार गणेशमूर्ती कशी असावी, याचे ज्ञान मिळेल आणि धर्मशिक्षणही मिळेल आणि त्या माध्यमातून माझ्याकडूनही धर्माची सेवा होईल’’, असे ते म्हणाले.
२. भोसरी येथील श्री. अविनाश देसले यांनीही त्यांच्या गणेशमूर्ती विक्री कक्षातून गणेशमूर्ती घेणार्यांना ‘श्री गणेशपूजाविधी’ हे १०० ग्रंथ भेट दिले.
३. ग्रंथ भेट देऊन धर्मकार्य होईल आणि ईश्वरसेवाही होईल असे सांगणारे श्री. बाळू वैद्य गुरुपौर्णिमा महोत्सव काळात संपर्कात आलेले तळेगांव दाभाडे येथील श्री. बाळू वैद्य यांनीही ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी’ हे २०० ग्रंथ घेऊन त्यांच्या गणेशमूर्ती विक्री कक्षातून गणेशमूर्ती घेणार्यांना भेट दिले. यातून त्यांना आनंदही मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्याकडूनही सनातनच्या लघुग्रंथांचे वितरण !
१ थेरगांव येथील उत्कर्ष गणेश मंडळाचे श्री. श्रीनिवास कलाटे यांनी गणेशभक्तांना ‘आरती कशी करावी’ हा लघुग्रंथ भेट दिला.
२. सिंहगड रस्ता येथील सुवर्णराज मित्र मंडळाचे श्री. बाळासाहेब दांगट यांनी ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष’, ‘आरती कशी करावी’, ‘आरतीसंग्रह’ आणि ‘श्री गणेश पूजाविधी’ हे ग्रंथ प्रसाद म्हणून गणेशभक्तांना भेट देण्याचे ठरवले.
३. सिंहगड रस्ता येथील शांतीनगर मंडळामध्ये अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात महिलांना भेट देण्यासाठी श्री. अविनाश चरवड यांनी ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष’चे ग्रंथ घेतले.
४. आंबेगाव येथील सदा शुभ कॉम्प्लेक्समध्ये गणेशोत्सवानिमित्त स्पर्धेतील मुलांना बक्षीस देण्यासाठी श्री. मारुती भाडळे यांनी ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष’चे ग्रंथ घेतले.
५. शिरवळ येथील मोरया गणेशोत्सव मंडळाचे श्री. सदाशिव जरांडे व सौ. संगीता जरांडे यांनी सनातन-निर्मित ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी’, ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष’, ‘नमस्काराच्या योग्य पद्धती’, ‘स्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र’ असे एकूण १०५ लघुग्रंथ घेतले. ‘‘वेगवेगळ्या ग्रंथाची माहिती हिंदूंना व्हावी आणि त्यातून धर्माचे शिक्षण मिळावे यासाठी हे ग्रंथ वाटू’’, असे त्यांनी सांगितले. शिरवळ मधील इतर मंडळांनाही ग्रंथांविषयी सांगेन असे मंडळाचे कार्यकर्ते सागर जरांडे यांनी सांगितले.
६. शिरवळ येथील श्री मोरया गणेशोत्सव मंडळ यांनी सनातन-निर्मित धर्मशिक्षण देणारे १०० ग्रंथ भाविकांना भेट दिले.
७. भोर येथील शिंदेवाडी भागातील श्री. बाबू सोनवणे यांनी गौरीनिमित्त भेट देण्यासाठी स्त्रियांनी ‘अलंकार घालण्यामागील शास्त्र’ हे ग्रंथ घेतले.
८. कोथरूड येथेही बाल तरुण मित्रमंडळाने महिलांमध्ये जागृती व्हावी, या दृष्टीने सनातनच्या ‘स्त्री शक्ती’ या विषयाच्या स्मरणिका वितरित केल्या.
पिंपरी येथील माजी नगरसेवक श्री. राजेश पिल्ले यांनीही त्यांच्या गणेशोत्सव मंडळात येणार्या भाविकांना देण्यासाठी ‘गणेशपूजाविधी’ हे ग्रंथ घेतले. ‘‘या ग्रंथांच्या माध्यमातून घराघरात गणेशपूजाविधीचे शास्त्र पोहोचेल’’, असे त्यांनी सांगितले.
शाडूमातीच्या मूर्तीसह सनातन-निर्मित लघुग्रंथ वितरण करणारे श्री गणेश कला केंद्र
गेली ११ वर्षे श्री गणेश कला केंद्राच्या वतीने शाडूमातीच्या मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने बनवून वितरण करतो. समाजाने अशा मूर्तीचे पूजन केल्यास खर्या अर्थी श्री गणेशाचे पूजन होऊन त्याची कृपा संपादन होईल, या उद्देशाने यंदाच्या वर्षी श्री गणेशमूर्तींचे वितरण केले. समाजातील भाविकांना त्या मूर्तीचा लाभ व्हावा आणि श्री गणेशाची मूर्ती कशी असावी, याचे शास्त्र माहिती व्हावे, यांसाठी सनातन-निर्मित ‘शास्त्रानुसार मूर्ती कशी असावी ?’ हे लघुग्रंथ ५०० जणांना दिले. भाविकांनी श्री गणेशाची मूर्ती घेत असतांना वरील लघुग्रंथ मागून घेतले, तसेच पुढच्या वर्षीसाठीही सात्त्विक गणेशमूर्तीची या वर्षीच मागणी नोंदवली. – श्री. चैतन्य तागडे, संयोजक, श्री गणेश कला केंद्र, पुणे शहर.
श्री गणेश पूजाविधीची माहिती मिळाल्याने लाभ झाला ! – भाविकांचा अभिप्राय
भाविक श्री गणेशमूर्तीची नोंदणी करत असतांनाच त्यांना दैनिक सनातन प्रभातचा ‘श्री गणेश विशेषांक आणि श्री गणेश पूजाविधी’ हा सनातन-निर्मित लघुग्रंथ भेट म्हणून दिल्यावर अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्यातील माहितीचा लाभ झाला, असे सांगितले. – श्री. सागर शिरोडकर, संयोजक, श्री गणेश कला केंद्र, हडपसर