पुणे येथील प्रबोधन कक्षाला जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद

पुणे : बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रबोधन कक्षास जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ४ दिवसांमध्ये शेकडो भाविकांनी कक्षाला भेट देऊन सनातन-निर्मित ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचा लाभ घेतला. प्रदर्शनाच्या ठिकाणी धर्मशिक्षण देणारे फलकही लावण्यात आले होते. तेही अनेक जणांनी जिज्ञासेने वाचले.

या प्रबोधन कक्षाला सदाशिव पेठेतील नारद बालक मंदिर शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. नीलिमा पेठे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी सनातनचे ग्रंथ पुष्कळ आवडल्याचे सांगितले. ‘धर्मशिक्षण फलक’ हा ग्रंथ घेऊन त्यांनी ‘‘यातील मजकूर शाळेच्या फलकावर नियमित लिहू’’, असे सांगितले. एका जोडप्याने ‘‘इतकी चांगली माहिती असलेले ग्रंथ आम्ही याआधी पाहिले नव्हते’’, असा अभिप्राय ग्रंथांच्या संदर्भात व्यक्त केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment