हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने विटा आणि मिरज येथे निवेदन
सांगली – २ सप्टेंबर २०१७ दिवशी बकरी ईद असून मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये मुसलमान आणि कसायांकडून मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल होण्याची शक्यता आहे. याच कालावधीत गणेशोत्सव चालू असल्याने एखाद्या गणेशोत्सवाच्या मंडपाच्या जवळ गोमांसाचे तुकडे सापडण्यासारखा प्रकार घडल्यास मोठ्या प्रमाणात कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ईदच्या पार्श्वभूमीवर अनेक मुसलमान कसायांकडून गायी आणि वासरे यांची मोठ्या प्रमाणावर खरेदीची शक्यता नाकारता येत नाही, तसेच अनेक मुसलमान वस्त्यांमध्ये गायी आणि वासरे बांधून ठेवल्याचे काही गोरक्षकांना दिसून आले आहे. तरी या विषयी प्रशासनाने सतर्क राहून गोहत्या होणार नाहीत, याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच ठिकठिकाणी टेहाळणी पथके ठेवून यावर लक्ष ठेवायला हवे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने मिरज येथे प्रांत कार्यालयात, तसेच विटा येथे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
विटा येथे नायब तहसीलदार श्री. नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्मसेनेचे सर्वश्री गणेश लोकरे, प्रमोद निकम, शुभम सुतार, अभिषेक निकम, शिव शिंदे, अमर शिंदे, भारतीय सैन्य दलातील सैनिक श्री. महेश सावंत, यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज येथे शिव उद्योग सहकार सेनेचे श्री. पंडितराव (तात्या)कराडे, युवासेनेचे श्री. कुबेरसिंह राजपूत यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात