बाजीराव रस्ता (पुणे) येथे गणेशोत्सवानिमित्ताने प्रबोधन कक्षाचे उद्घाटन
पुणे : गेली ८ वर्षांहून अधिक काळ मी गणेशोत्सवाच्या काळात बाजीराव रस्त्यावर सनातनचा प्रबोधन कक्ष कायम पाहिला आहे. या प्रबोधन कक्षाच्या माध्यमातून जागृती होणार असून आम्ही सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर आहोत. कधीही कोणतेही साहाय्य लागल्यास आवर्जून सांगा, असे प्रतिपादन बाजीराव रस्ता नातूबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि कसबा मतदारसंघाचे भाजपा सरचिटणीस श्री. प्रमोद कोंढरे यांनी केले. येथील बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रबोधन कक्षाचे उद्घाटन श्री. कोंढरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी श्री. कोंढरे यांचे सहकारी श्री. अमित भागवत, समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती दाते यांनी, तर श्री. कोंढरे यांची ओळख श्री. घनवट यांनी करून दिली.
वैशिष्ट्यपूर्ण
श्री. कोंढरे यांनी प्रबोधन कक्षाची पाहणी केल्यावर काही सात्त्विक उत्पादने खरेदी केली. त्यानंतर ते म्हणाले की, अशा प्रकारचा प्रबोधन कक्ष पुढच्या वर्षी आमच्या मंडळाजवळ चांगला लावूया.