रेंदाळ (तालुका हातकणंगले) – गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने येथील श्री ॐ सेवाभावी संस्था यांच्या मंडळात २५ ऑगस्टला सामूहिक गणेशाचा नामजप आणि ‘गणेश पूजनाविषयीचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन पार पडले. प्रारंभी पुरोहित श्री. मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर अथर्वशीर्षपठण करण्यात आले. तसेच सनातनच्या संत सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आवाजातील ‘ॐ गं गणपतये नम:’ हा नामजप ध्वनीक्षेपकावर लावून उपस्थितांकडून तो सामूहिकरित्या ५०१ वेळा नामजप करण्यात आला. या वेळी ४५ महिला आणि २५ पुरुष, अशी एकूण ७० जिज्ञासूंची उपस्थिती होती.
१. सामूहिक नामजप करत असतांना महिलांनी श्रीफळ आणले होते, तसेच जप करता-करता सुपारीच्या प्रतीकात्मक गणेशमूर्तीवर अक्षता वाहिल्या जात होत्या.
२. श्री गणेशाचा सामूहिक नामजप चालू असतांना या कालावधीत सनातन-निर्मित सात्त्विक भीमसेनी कापूर प्रज्वलित करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांना ‘श्री गणेश पूजनाचे अध्यात्मशास्त्र, गणेशाच्या नामजपाचे महत्व तसेच गणेशमूर्तीचे दान न करता वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे शास्त्र’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
३. कार्यक्रम स्थळी धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले होते. याला आणि येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
४. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धर्मप्रेमी सर्वश्री बाळकृष्ण पाटील, रवींद्र गायकवाड, गोविंदराव गायकवाड, शिवाजीराव माळी, अनिकेत निकम, प्रशांत घोरपडे, सचिन कोळी, डॉ. महेश कदम यांनी परिश्रम घेतले.
क्षणचित्र
श्री गणेशाचा सामूहिक नामजप करतांना शेवटी १५ ते २० मिनिटे पाऊस पडत असूनही सर्व जिज्ञासू एकाग्रतेने जप करत होते. एकही जागेवरून उठला नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात