समलैंगिक व्यक्तीने केलेले रक्तदान रक्तपेढीने (‘ब्लड बँक’ने) न स्वीकारणे योग्य कि अयोग्य ?

सध्या भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांतील रक्तपेढ्या (‘ब्लड बँक’स्) समलैंगिक व्यक्तीने केलेले रक्तदान स्वीकारत नसल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात रक्तपेढ्यांचा दावा असतो की, बहुतांश वेळा समलैंगिक व्यक्ती ‘HIV’ विषाणूने बाधित असतात. त्यामुळे रक्तचाचणी करून ‘ते ‘HIV’ विषाणूने बाधित आहे कि नाही’ हे शोधण्यात वेळ दवडण्यापेक्षा या वर्गाने (समलैंगिकांनी) केलेले रक्तदान न स्वीकारणे योग्य ठरते. सध्या या विषयावर जगभर चर्चा चालू आहे. लॉस एंजलिस (अमेरिका) येथील न्यायालयाने ‘समलैंगिकांचे रक्तदान न स्वीकारणे, हे अशास्त्रीय आहे’, असा निवाडा दिला आहे. इंग्लंडमध्ये ‘फ्रीडम टू डोनेट’ (दान देण्याचे स्वातंत्र्य) ही चळवळ समलैंगिकांनी चालू केली आहे. प्रत्येक गोष्टीमागे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणे असतात. शारीरिक आणि मानसिक कारणांमागील तथ्य विज्ञान सांगू शकते किंवा प्रयोगशाळेत त्याविषयी संशोधन केले जाऊ शकते. आध्यात्मिक कार्यकारणभाव मात्र साधनेद्वारे आध्यात्मिक उन्नती केलेले संतच सांगू शकतात. या संदर्भात अध्यात्मशास्त्र काय सांगते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

कुठलाही मनोविकार (Psychosomatic
Disorder) असलेल्या व्यक्तीचे रक्त अन्य रुग्णाला दान करणे हानीकारक !

‘अध्यात्मशास्त्रानुसार मनातील प्रत्येक विचार, भावना, स्वभावदोष, विकृती आदींचा शरिरातील आणि रक्तातील प्रत्येक पेशीवर परिणाम होत असतो. ‘इओसिनोफिलीआ’ या रक्तातील पेशींच्या रोगाचे एक कारण मानसिक तणाव, हेही असू शकते’, हे संशोधनाअंतीही सिद्ध झाले आहे. मानसशास्त्रानुसार समलैंगिकता हा मनोविकार आहे. या मानसिक विकृतीचा रक्तातील पेशींवरही परिणाम होऊ शकतो; कारण ‘HIV’च्या विषाणूपेक्षा मनातील विचार, भावना, दोष किंवा विकृती अधिक सूक्ष्म असतात. ज्या प्रकारे ‘HIV’ विषाणूने बाधित रुग्णाचे रक्त अन्य रुग्णासाठी हानीकारक ठरते, तसेच समलैंगिकतेसम मानसिक विकृती असलेल्या व्यक्तीचे रक्तही अन्य रुग्णासाठी हानीकारक ठरू शकते. असे केल्याने अन्य रुग्णातही ते विचार, त्या भावना, तो दोष आणि ती विकृती यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी कुठल्याही प्रकारचा मनोविकार (Psychosomatic Disorder) असलेल्या व्यक्तीचे रक्त अन्य रुग्णाला दान करणे घातक ठरू शकते.’

 

Leave a Comment