श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास
केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावापासून १७ किलोमीटर अंतरावर ‘आव्हाणे बुद्रूक’ नावाचे गाव आहे. अवनी नदीच्या तीरावर असणार्या या गावातील श्री गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. येथील श्री गणेशमूर्ती निद्रावस्थेत विराजमान असून ती दक्षिणोत्तर आहे. महाराष्ट्रात अशी दुर्मिळ मूर्ती अन्यत्र कोठेही नाही. अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या मोरगांवच्या गणपतीचे अंशात्मक स्थान म्हणून हा गणपति ओळखला जातो.