हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात प्रवचने आणि संपूर्ण वन्दे मातरमचे आयोजन

क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन पहातांना नागरिक

डोंबिवली : स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे झुकणारी पिढी, राष्ट्रप्रेमी राज्यकर्त्यांचा अभाव, वन्दे मातरमला विरोध करणारे धर्मांध ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन श्री. सुनील कदम यांनी संकेश्‍वर पाल्म सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. ५० जणांनी याचा लाभ घेतला. या वेळी क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शनही लावण्यात आले. या वेळी आयोजकांनी नवरात्रोत्सवातही उपक्रम राबवण्याविषयी समितीला आमंत्रण दिले.

डोंबिवली येथील तोडवळकर विद्यालयात क्रांतीकारकांच्या चित्रांच्या लावलेल्या प्रदर्शनाचा लाभ १०० विद्यार्थ्यांनी घेतला.

क्षणचित्र

प्रत्येक शिक्षकांनी स्वतःहून विद्यार्थ्यांना माहिती लिहून घेण्यास सांगितले. क्रांतीकारकांचे प्रदर्शन पाहून शिक्षक प्रभावित झाले. असे प्रदर्शन प्रत्येक शाळेत लावायला हवे, असे अनेक शिक्षकांनी सांगितले.

महाराष्ट्र नगरातील सुसंस्कार कोचिंग क्लास मध्येही प्रवचन घेण्यात आले. त्याचा लाभ ६१ विद्यार्थ्यांनी घेतला.

ठाणे

नौपाडा येथील महाराष्ट्र विद्यालयात प्रवचन घेण्यात आले. ५०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शाळेतील ध्वनीक्षेपक यंत्रणेवरून अन्य वर्गांतील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता आला. मुख्याध्यापक श्री. बी.बी. ठाणेकर यांनी सर्वतोपरी साहाय्य केले.

क्षणचित्र

शारदोत्सवातही सनातनच्या चांगल्या वक्त्यांना मार्गदर्शनासाठी संपर्क करणार असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.

सनातन संस्थेच्या साधकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली. याचा आम्ही कधी विचारच केला नाही. सनातनच्या साधकांचे मार्गदर्शन फारच मोलाचे आहे. हे आम्हाला अगदीच पटले आहे. याचा वापर आम्ही आमच्या जीवनात नक्कीच करू, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

भिवंडी

भिवंडी, भंडार्ली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व्याख्यान घेण्यात आले होते. सामूहिक वन्दे मातरम् चालू होण्यापूर्वी वीज गेली. धर्माभिमानी श्री. गिरीश पाटील यांनी गावदेवीमातेला कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करताच वीज आली.

अंबरनाथ

अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने हुतात्मा चौकात झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या दहीहंडी उत्सव मंडळाच्या वतीने श्री. सचिन पाटील आणि श्री. गणेश गायकवाड यांच्या सहकार्याने राष्ट्रगीत झाल्यावर संपूर्ण वन्दे मातरम् ऐकवण्यात आले. समितीची राष्ट्रध्वजाचा सन्मान राखाही ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या वेळी चौकात १०० ते १२५ लोक थांबले होते. अंबरनाथच्या नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोड आणि नगरपरिषदेतील संगणक प्रमुख श्री. सुहास सावंत उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. काही वाहन चालकांनी वाहन रस्त्यात थांबवून वन्दे मातरम् संपल्यानंतरच वाहन पुढे नेले.

२. कार्यक्रम नगरपरिषदेतील संगणक प्रमुख श्री. सुहास सावंत यांच्या पुढाकाराने पार पडला. त्यांनी नगरपरिषदेतील गणेशोत्सवातही मार्गदर्शन करण्याविषयी समितीला आमंत्रण दिले.

३. नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोड यांनी वन्दे मातरम्चा कार्यक्रम चांगला झाल्याचे सांगितले.

कल्याण

कल्याण येथील शिशुविकास विद्यालय, बेतूरकर पाडा आणि एम्.जे.बी. कन्या विद्यालय जोशीबाग स्टेशन रोड, कल्याण पश्‍चिम येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि गणेशोत्सव यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment