उल्हासनगर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेली दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा १२ आणि १३ ऑगस्ट या दिवशी उल्हासनगर येथील स्वामी टेऊराम सिंधी धर्मशाळेच्या आतील सभागृहात घेण्यात आली. या वेळी मुंबई, ठाणे आणि रायगड येथील धर्मप्रेमी उपस्थित होते. उत्तम हिंदु राष्ट्र संघटक होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रकिया राबवून ईश्वरचरणी कृतज्ञतापूर्वक शरण जाऊन व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचा निर्धार सर्वांनी केला. या वेळी सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. कार्यशाळेची प्रस्तावना समितीचे श्री. सागर चोपदार यांनी केली.
१. ‘जीवनातील साधनेचे ध्येय’ या विषयावर सर्वांना सहज आकलन होईल, अशा प्रकारे फळ्यावर चित्रे काढून अणि उदाहरणे देऊन समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी मार्गदर्शन केले.
२. समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदुत्वाचे कार्य करतांना प्रशासन वर्ग, राजकारणातील मान्यवर, तसेच पोलीस प्रशासन यांच्याशी कसा संवाद आणि समन्वय साधायचा, याविषयी मार्गदर्शन केले.
३. दुसर्या दिवशीच्या सत्रामध्ये वाईट शक्तींचे अस्तित्व, त्रास आणि त्यावरील उपाय याविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन झाले हिंदु राष्ट्र्र संकल्पना स्पष्ट केल्यावर सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी सुराज्य अभियानाअंतर्गत विविध माध्यमांद्वारे कसा लढा द्यावा यांचेही प्रबोधन करून नंतर प्रायोगिक भाग झाले.
फलनिष्पती !
कार्यशाळेला सर्व धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. साधनेचे योग्य दृष्टीकोन, अनिष्ट शक्तींमुळे होणारे त्रास त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्र संघटकाची आचारसंहिता कशी असावी याविषयी अनमोल मार्गदर्शन मिळाले, असे अभिप्राय धर्मप्रेमींनी दिले. त्याचप्रमाणे कार्यशाळेतील मार्गदर्शनातून नव्याने स्फूर्ती घेऊन आपापल्या विभागात जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्याचे आश्वासन दिले.
सहकार्य करणार्यांविषयी आभार !
कार्यशाळेचे सभागृह, तसेच व्यासपीठ अणि आसंद्या स्वामी टेऊराम सिंधी धर्मशाळेच्या व्यवस्थापक मंडळाने विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. भोजन व्यवस्था श्री. प्रफुल्ल भोसले यांनी एक वेळचे जेवण आणि त्यांच्या ओळखीच्या कॅटरिंगवाल्याकडून भांडी उपलब्ध करून दिली. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. रवी पाटील यांनी तीन वेळचे रात्रीचे भोजन उपलब्ध करून दिले. अंबरनाथ येथील विठ्ठल मंदिराचे सल्लागार श्री. हिंदुराव यांनी चहा उपलब्ध करून दिला. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या एक भक्ताने ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली.