शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) : शिरोळ येथील गणेश मंदिरात सनातन संस्थेच्या सौ. सुप्रिया घाटगे यांनी ‘श्री गणेश चतुर्थी व्रत’ यावर मार्गदर्शन केले. या वेळी महिलांनी ग्रामपंचायत येथे गणेशोत्सवाचे निवेदन देण्यासाठी उपस्थित राहू, असे सांगितले, तसेच धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली. शिरोळ येथील दत्त साखर कारखाना येथेसौ. प्रतिभा भोसले यांच्या घरी सौ. सुप्रिया घाटगे यांनी ‘श्री गणेशाची वैशिष्ट्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. येथेही धर्मशिक्षण वर्गाची मागणी करण्यात आली आहे.