
फैजाबाद : पंडित दीनदयाल जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने फैजाबाद येथे ‘राष्ट्रस्तरीय समाजसेवा सत्कार समारंभ २०१७’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘सेवा सहयोगी संगम’च्या वतीने सनातन संस्थेला ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण’ या कार्यासाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सनातन संस्थेच्या वतीने फैजाबाद येथील साधक डॉ. नंदकिशोर यांनी स्वीकरला.