कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’ आणि ‘सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती’ यांच्या तुलनेत ‘सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असल्याचे स्पष्ट

पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या
साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो. स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि अध्यात्मशास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते, म्हणजे अशा मूर्ती सात्त्विक असतात. ‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती यांचा त्यांच्या भोवतीच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञान वापरण्यात आले. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. २.८.२००८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत श्री गणेशाची मूर्ती पटलावर (‘टेबला’वर) ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळची नोंद’ होय. त्यानंतर कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती एकेक करून पटलावर ठेवून ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या ‘तिन्ही प्रकारच्या मूर्तींतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर जाणता आले.

२. चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती

२ आ. सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती : ही पेठेत (बाजारात) मिळणारी सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती आहे.

२ इ. सनातन-निर्मित शास्त्रीय (अध्यात्मशास्त्रानुसार बनवलेली आणि सात्त्विक असलेली) रंगीत गणेशमूर्ती : ही मूर्ती साधक-मूर्तीकारांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीभावाने बनवली आहे.

३. ‘पिप’ तंत्रज्ञानाची ओळख

३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

३ आ. ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक
आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे

या तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. ‘पिप’ या संगणकीय प्रणालीला ‘व्हिडीओ कॅमेर्‍या’शी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे.

४. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता

अ. या चाचणीची ‘पिप’ छायाचित्रे घेण्यासाठी विशिष्ट कक्ष (खोली) वापरण्यात आला. या कक्षाच्या भिंती, छत आदींच्या रंगांचा चाचणीतील घटकाच्या प्रभावळीतील रंगांवर परिणाम होऊ नये, यासाठी भिंती, छत आदींना पांढरा रंग दिला होता.

आ. संपूर्ण चाचणीच्या वेळी कक्षातील प्रकाशव्यवस्था एकसारखीच ठेवली होती, तसेच कक्षाबाहेरील हवा, प्रकाश, उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी चाचणीच्या वेळी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.

५. चाचणीतील ‘पिप’ छायाचित्रे आणि
निरीक्षणे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे

लेखात दिलेल्या ‘पिप’ छायाचित्रांमध्ये नकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांविषयीचे लिखाण गडद जांभळ्या रंगात, तर सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांविषयी लिखाण निळ्या रंगात दिले आहे.

५ अ. मूळची नोंद (वातावरणाची मूलभूत प्रभावळ)

चाचणीमध्ये एखाद्या घटकामुळे (उदा. या चाचणीत श्री गणेशाच्या मूर्तीमुळे) वातावरणात झालेला पालट अभ्यासण्यासाठी त्या घटकाचे ‘पिप’ छायाचित्र घेतात; पण वातावरणात सातत्याने पालट होत असल्यामुळे घटकाची चाचणी करण्यापूर्वी घटक ठेवणार असलेल्या वातावरणाचे (उदा. या चाचणीत श्री गणेशाची मूर्ती पटलावर ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाचेेेे) ‘पिप’ छायाचित्र प्रथम घ्यावे लागते. याला ‘मूळची नोंद’ म्हणतात. नंतर घटकाच्या ‘पिप’ छायाचित्राची ‘मूळच्या नोंदी’शी (वातावरणाची मूलभूत प्रभावळ दर्शवणार्‍या ‘पिप’ छायाचित्राशी) तुलना केल्यानंतर त्या घटकामुळे वातावरणात झालेला पालट लक्षात येतो.

५ आ. मूळच्या नोंदीच्या तुलनेत वस्तूची प्रभावळ दर्शवणार्‍या
‘पिप’ छायाचित्रातील रंगांच्या प्रमाणात वाढ किंवा घट होण्यामागील तत्त्व

चाचणीसाठी घटक (या चाचणीत श्री गणेशाची मूर्ती) ठेवण्यापूर्वीच्या (‘मूळच्या नोंदी’च्या) तुलनेत घटक ठेवल्यानंतरच्या प्रभावळीतील रंगाच्या प्रमाणात वाढ किंवा घट होते. ही वाढ किंवा घट त्या घटकातून प्रक्षेपित होणार्‍या त्या रंगाशी संबंधित स्पंदनांच्या प्रमाणानुसार असते, उदा. चाचणीसाठी घटक ठेवल्यानंतर त्यातून चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढते, तर चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण न झाल्यास किंवा इतर स्पंदनांच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण घटते. (हे लक्षात घेऊन सूत्र ‘६ अ. निरीक्षण १’ आणि ‘६ आ. निरीक्षण २’मध्ये दिलेल्या सारण्या वाचाव्यात.)

५ इ. प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती

चाचणीतील वस्तूच्या (किंवा व्यक्तीच्या) ‘पिप’ छायाचित्रांत दिसणार्‍या प्रभावळींचे रंग हे त्या वस्तूच्या ऊर्जाक्षेत्रातील विशिष्ट स्पंदने दर्शवतात. प्रभावळीतील प्रत्येक रंगाविषयी ‘पिप’ संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या कार्यपुस्तिकेतील (‘मॅन्युअल’मधील) माहिती आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेल्या शेकडो चाचण्यांतील निरीक्षणांचा अनुभव यांच्या आधारे ‘प्रत्येक रंग कोणत्या स्पंदनाचा दर्शक आहे ?’, ते निश्‍चित केले आहे. ते सूत्र ‘६ अ. निरीक्षण १’मध्ये दिलेल्या सारणीतील दुसर्‍या उभ्या स्तंभात सांगितले आहे.

५ ई. नकारात्मक स्पंदने

‘पिप’ छायाचित्रातील राखाडी, गुलाबी, नारिंगी आणि भगवा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक त्रासदायक ते अल्प त्रासदायक स्पंदने दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या त्रासदायक असणार्‍या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे ‘नकारात्मक स्पंदने’ असे संबोधले आहे.

५ उ. सकारात्मक स्पंदने

‘पिप’ छायाचित्रातील फिकट गुलाबी, पोपटी, निळसर पांढरा, पिवळा, गडद हिरवा, हिरवा, निळा आणि जांभळा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक ते अल्प लाभदायक स्पंदने (रंग) दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणार्‍या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे ‘सकारात्मक स्पंदने’ असे संबोधले आहे.

५ ऊ. ‘पिप’ छायाचित्रात सर्वसाधारणपेक्षा उच्च
सकारात्मक स्पंदनांचे दर्शक रंग दिसणे अधिक चांगले असणे

‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांचे स्थान (जागा) त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेले असते.

५ ए. ‘पिप’ छायाचित्रातील रंगांच्या वैशिष्ट्यांचा
त्या रंगाच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्याशी संबंध नसणे

‘पिप’ संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी ‘पिप’ छायाचित्रात नकारात्मक स्पंदनांसाठी भगवा आणि नारिंगी, हे रंग निर्धारित केले आहेत. त्याचा आणि त्या रंगांच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा (उदा. भगवा रंग त्याग अन् वैराग्य यांचे प्रतीक आहे.) कोणताही संबंध नाही.

५ ऐ. ‘पिप’ छायाचित्रांची तुलना करतांना चाचणीसाठी ठेवलेली
श्री गणेशाची मूर्ती, तसेच पटल यांवरील रंग ग्राह्य धरलेले नसणे

ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप’ छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना चाचणीसाठी ठेवलेली श्री गणेशाची मूर्ती , तसेच पटल यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

६. निरीक्षणे

६ अ. निरीक्षण १ – ‘पिप’ छायाचित्रांत दिसणार्‍या प्रभावळींचे रंग,
ते कशाचे दर्शक आहेत आणि त्यांच्या प्रमाणात झालेली वाढ किंवा घट

‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती यांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळच्या नोंदी’शी केली आहे’, हे लक्षात घेऊन पुढील सारणी वाचावी.

टीप १ – या मूर्तीतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमुळे वातावरणातील भावनिक तणाव वाढला (मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या पेठेतील (बाजारी) रंगांचा हा परिणाम असू शकतो.); पण नकारात्मकता पूर्णपणे नष्ट झाली, तसेच सकारात्मक स्पंदनांपैकी स्थूल स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता थोडी वाढली, तर सकारात्मकता आणि सात्त्विकता पुष्कळ वाढली, हे वरील सारणीतील सूत्र ‘२ अ’, ‘२ इ’ आणि ‘२ ई’ वरून स्पष्ट होते.

टीप २ – घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

टीप ३ – या मूर्तीतून पोपटी रंगात दिसणारी सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमतेची स्पंदने थोड्या प्रमाणात प्रक्षेपित झाली आहेत. हे या सारणीतील सूत्र ‘१ अ’ वरून स्पष्ट होते. याविषयी अधिक माहितीसाठी सूत्र ‘५ ऊ’ पहावे.

टीप ४ – घटकाच्या केवळ बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

६ आ. निरीक्षण २ – ‘पिप’ छायाचित्रांतील प्रत्येक स्पंदनाचेे (रंगांचे) प्रमाण (टक्के)

 

टीप : छायाचित्रांत दिसणार्‍या विविध रंगांचे प्रमाण ठरवण्यासाठी ‘पिप’ छायाचित्रावर आलेख कागदावर असतात, तशा अनेक चौकटी संगणकीय प्रणालीद्वारे योजल्या. त्यानंतर छायाचित्रातील एकूण चौकटी आणि त्यांच्या तुलनेत प्रभावळीतील प्रत्येक रंगाने व्यापलेल्या चौकटी यांची संख्या मोजली. त्यांचे टक्क्यांमध्ये रूपांतर करून प्रभावळीतील प्रत्येक रंगाचे प्रमाण (टक्के) सर्वसाधारणपणे निश्‍चित केले.

टीप १ – ‘पिप’ संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी ‘पिप’ छायाचित्रात निर्धारित केलेल्या रंगांमध्ये स्पंदने एकत्रित दर्शवणार्‍या रंगांची माहिती नसल्यामुळे आम्ही ही स्पंदने ‘तटस्थ’ धरली आहेत.

७. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष

७ अ. मूळची नोंद – सनातन आश्रमातील
सात्त्विक वातावरणामुळे सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक दिसणे

कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा ‘सनातन आश्रमा’त केलेली असल्याने ‘मूळच्या नोंदी’च्या वेळीही (चाचणीसाठी गणेशमूर्ती पटलावर ठेवण्यापूर्वीच्या) प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक आहे.

७ आ. कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे
वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण मूळ स्पंदनांच्या तुलनेत पुष्कळ वाढणे

पटलावर कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती ठेवल्यानंतर मूळच्या नोंदीच्या तुलनेत वातावरणातील नकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी भगवा रंग दिसत नाही; परंतु नारिंगी रंग ५ पटींनी वाढला आणि गुलाबी रंग पुष्कळ प्रमाणात दिसू लागला. याउलट वातावरणातील सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी पिवळा, गडद हिरवा आणि निळा, हे रंग दिसत नाहीत. हिरवा रंग पुष्कळ वाढला आहे, तर जांभळा रंग थोड्या प्रमाणात दिसू लागला. दोन वेगळी स्पंदने एकत्रित दर्शवणारा जांभळा आणि हिरवा रंग एकत्र येऊन दिसणारा निळसर राखाडी रंग थोड्या प्रमाणात दिसू लागला. मूळच्या नोंदीतील ३४ टक्के नकारात्मक स्पंदनांच्या तुलनेत या मूर्तीमधून ६१ टक्के नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र क्र. ‘८’ मध्ये दिले आहे.

७ इ. मातीच्या सर्वसाधारण गणेशमूर्तीमुळे
वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अत्यल्प वाढणे

पटलावर मातीची सर्वसाधारण मूर्ती ठेवल्यानंतर मूळच्या नोंदीच्या तुलनेत वातावरणातील नकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी भगवा रंग दिसत नाही; परंतु नारिंगी रंग ४ पटींनी वाढला आहे. याउलट वातावरणातील सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी पिवळा रंग दिसत नाही. गडद हिरवा निम्मा झाला आहे, तर हिरवा आणि निळा हे रंग पुष्कळ वाढले आहेत. सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता दर्शवणारा पोपटी रंग थोड्या प्रमाणात दिसत आहे. मूळच्या नोंदीतील ६६ टक्के सकारात्मक स्पंदनांच्या तुलनेत या मूर्तीमधून ६८ टक्के सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र क्र. ‘८’ मध्ये दिले आहे.

७ ई. सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्तीमुळे
वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे

पटलावर सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती ठेवल्यानंतर मूळच्या नोंदीच्या तुलनेत वातावरणातील नकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी भगवा रंग दिसत नाही; परंतु नारिंगी रंग दुप्पट झाला आहे. याउलट वातावरणातील सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी पिवळा रंग दिसत नाही, गडद हिरवा थोडा वाढला आहे, तर हिरवा आणि निळा हे रंग पुष्कळ वाढले आहेत. सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता दर्शवणारा पोपटी रंग थोड्या प्रमाणात दिसू लागला आहे. मूळच्या नोंदीतील ६६ टक्के सकारात्मक स्पंदनांच्या तुलनेत या मूर्तीमधून ८४ टक्के सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र क्र. ‘८’ मध्ये दिले आहे.

८. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

८ अ. कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती

ही मूर्ती कागदाचा लगदा या असात्त्विक आणि अशास्त्रीय घटकापासून बनवलेली आहे. देवतेची मूर्ती अध्यात्मशास्त्रानुसार बनवली नसली, तर काय दुष्परिणाम होऊ शकतो, याचे हे एक उदाहरण आहे. यावरून प्लास्टिक, बाटल्या आदी असात्त्विक घटकांंपासून बनवलेली किंवा विडंबनात्मक मूर्ती यांतून किती मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत असतील, याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे अशी मूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक ठरणार आहे.

८ आ. सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती

ही मूर्ती मातीपासून बनली असल्याने आणि गणपतीच्या सर्वसाधारण आकृतीबंधानुसार असल्याने त्यातून मूळ नोंदीच्या तुलनेत थोडी अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत.

८ इ. सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती

ही मूर्ती शास्त्रानुसार, म्हणजे ऋषिमुनींनी सांगितलेल्या मूर्तीविज्ञानानुसार असल्यामुळे यातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत आणि त्यामुळे ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक प्रमाणात लाभदायक ठरते. अशा मूर्तीची पूजा आणि उपासना करणे उपासकाच्या दृष्टीने लाभदायक आहे !

९. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या मूर्तीमध्ये श्री गणपतितत्त्व
पुष्कळ अधिक प्रमाणात असण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे

९ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प अन् त्यांचे लाभलेले मार्गदर्शन !

‘संतांच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे त्यांच्यात संकल्पशक्ती असते. ‘एखादी गोष्ट घडो’, एवढाच विचार त्यांच्या मनात आला, तरीही ती गोष्ट घडते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात ‘समाजाला श्री गणपतीची सात्त्विक मूर्ती उपलब्ध व्हायला हवी’, असा विचार येणे, हा संकल्पच आहे. त्यामुळे देवतांची मूर्ती बनवणारे साधक-कलाकार पुढे आले आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रमपूर्वक आणि सूक्ष्म-स्तरावरील अभ्यास करून मूर्ती बनवली.

९ आ. ‘सनातन-निर्मित श्री गणपतीची मूर्ती’ हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या
रूपाच्या वर्णनानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार असणे

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यामुळे देवतेचे रूप आले की, त्याची शक्ती तेथे असतेच. प्रत्येक देवतेच्या रूपाचे वर्णन द्रष्ट्या ऋषिमुनींनी धर्मशास्त्रात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे मूर्तीकाराने स्वतःच्या कल्पनेने बनवलेल्या मूर्तीपेक्षा धर्मशास्त्रात दिलेल्या वर्णनानुसार असलेल्या मूर्तीत त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. धर्मशास्त्रात एकाच देवतेची अनेक नावे आणि त्यानुरूप असणार्‍या रूपांचा उल्लेख आढळतो. अशा वेळी उपासकांनी काळानुसार देवतेच्या कोणत्या रूपाची उपासना करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे, ते केवळ अध्यात्मातील जाणकार, म्हणजे संतच सांगू शकतात. सनातन-निर्मित श्री गणपतीची मूर्ती हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाचे वर्णन आणि काळानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन यांनुसार बनवलेली आहे.

९ इ. साधक-कलाकारांनी व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन नव्हे,
तर ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’, या भावाने श्री गणपतीची मूर्ती बनवणे

चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्‍वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्‍वराची (सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्‍या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. थोडक्यात सांगायचे, तर ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’, याची जाणीव परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे साधक-कलाकारांना सतत होती. श्री गणपतीची मूर्ती बनवण्यामागे त्यांचा अन्य कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता.

९ ई. साधक-कलाकारांमध्ये सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असणे

स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म.’ ‘श्री गणपतीची मूर्ती बनवतांना त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व येत आहे का ?’, हे कळण्यासाठी मूर्तीकारामध्ये सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता असावी लागते. ही क्षमता योग्य साधनेने विकसित होते. साधक-कलाकारांमध्ये ती क्षमता असल्याने ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकाधिक गणेशतत्त्वे असणारी श्री गणपतीची मूर्ती बनवू शकले.

१०. आपल्या अद्वितीय संशोधनातून समाजाला आध्यात्मिक स्तरावर लाभदायक
असणारी चित्रे, मूर्ती, ग्रंथ आदी उपलब्ध करून देणारे ऋषितुल्य परात्पर गुरु डॉ. आठवले !

योगशास्त्र, नाट्यशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, मूर्तीशास्त्र आदी सर्वच प्राचीन शास्त्रांचे रचनाकार ऋषीमुनी हे संशोधकच होते. त्यांनी मानवाच्या उन्नतीसाठी अनेक शास्त्रांची निर्मिती केली. त्यांनी सर्वोच्च ज्ञान मिळवून मानवाला प्रत्येक विषयातील अंतिम सत्य काय आहे, ते आधीच सांगून ठेवले आहे. त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. प्राचीन ऋषीमुनींचीच परंपरा पुढे चालवणारे अध्यात्मातील अद्वितीय कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. त्यांनी मे २०१७ पर्यंत अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे ज्ञान देणारे ३०१ ग्रंथ प्रकाशित केले आहेत, तर ३,६९९ ग्रंथ प्रकाशित होऊ शकेल, एवढे ज्ञान त्यांच्या संग्रही आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-कलाकारांनी देवतांची तत्त्वे अधिक प्रमाणात असणारी चित्रे आणि मूर्ती यांची निर्मिती केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण आध्यात्मिक परिभाषेतून देणारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ आकार घेत आहे !’

११. कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण

११ अ. १० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर
पाणी प्रदूषित होणे आणि त्यात विषारी धातू आढळून येणे

मुंबईतील प्रसिद्ध शासकीय ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’ (Institute of Chemical Tecnhology, Mumbai) यांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या ४ मूर्ती घेऊन या विषयाचे संशोधन केले. त्यांनी सांगितले, ‘१० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅड्मियम, टायटॅनिअम ऑक्साईड, असे विषारी धातू आढळून आले.’

११ आ. कागद विरघळवलेल्या पाण्यात प्राणवायूची
(ऑक्सिजनची) मात्रा शून्यावर आल्याचे प्रयोगातून सिद्ध होणे

सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेनेे साधा कागद डिस्टील्ड वॉटरमध्ये टाकून संशोधन केले. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आल्याचे त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाले. हेे अत्यंत घातक आहे.

११ इ. कागदी लगदा जलाशयात जाणे तेथील माशांसाठी धोकादायक असणे

एका अभ्यासात आढळले, ‘कागदाचा लगदा पाण्यात गेल्यावर त्याचे बारीक कण होतात. मासे त्यांच्या कल्ल्यांद्वारे श्‍वसन करत असतात. हे कागदी लगद्याचे बनलेले बारीक कण या कल्ल्यांमध्ये अडकून पडू शकतात. त्यामुळे त्यांच्या श्‍वसनप्रक्रियेवर परिणाम होतात.’

११ ई. वृत्तपत्रांसाठी अथवा अन्य कागदांवर छपाईसाठी वापरली जाणारी शाई पर्यावरणपूरक असेलच, असे नाही. बहुतांशी ती घातक असते.

१२.  निष्कर्ष

‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा वापर करून कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती, यांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी घेतलेल्या चाचणीचाही पिप चाचणीसारखाच निष्कर्ष येणे : कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती, सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती यांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने १.८.२०१७ या दिवशी वैज्ञानिक चाचणी घेतली होती. त्या चाचणीतील निरीक्षणांचे सार पुढीलप्रमाणे आहे.

वरील निरीक्षणांतून स्पष्ट होते, ‘गणेशपूजकाला कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक तर नाहीच, उलट अत्यंत हानीकारक आहे. सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या अत्यल्प प्रमाणात लाभदायक आहे आणि सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे.’

‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक तर नाहीच, उलट हानीकारकच आहे’, हे ‘पिप’, तसेच ‘यू.टी.एस्’ प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. ‘अशी मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीनेही किती घातक आहे’, हेही विविध संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. गणेशपूजकांनो, हे लक्षात घेऊन कागदी गणेशमूर्ती, अन्य अशास्त्रीय घटकांपासून बनवलेली, तसेच अशास्त्रीय आकारांत बनवलेली गणेशमूर्ती कदापी वापरू नका. शक्य असल्यास शास्त्रीय गणेशमूर्ती वापरून गणेशपूजनाचा पूर्ण लाभ घ्या. अशी मूर्ती उपलब्ध नसल्यास निदान शाडूच्या मातीची पारंपरिक गणेशमूर्ती पूजनाकरता वापरा.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (५.८.२०१७)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment