विटा (जिल्हा सांगली) : भारतीय सीमेत घुसखोरी करणार्या आणि भारताला युद्धाची धमकी देणार्या चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांना देण्यात आले. या वेळी शासनाने गणेशोत्सवात शाडूच्या मातीच्या मूर्तीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत, कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देणे थांबवावे, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करा, अशा मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. हेच निवेदन पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनाही देण्यात आले.
या वेळी हिंदु धर्मसेनेचे संस्थापक श्री. शिवभैय्या शिंदे, सर्वश्री अमर शिंदे, ऋषिकेश चव्हाण, ऋषिकेश भस्मे, श्रीमान हिंदवी प्रतिष्ठानचे महेश बाबर, शरद कोळी, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तासगाव : येथे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत आणि तहसीलदार श्री. सुधाकर भोसले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री. सचिन चव्हाण, श्री. दत्तात्रय येडके यांच्यासह सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.