नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी वस्तूंची होळी

नंदुरबार : आपल्या राष्ट्राशी शत्रुत्व ठेवणार्‍या देशाने उत्पादित केलेल्या वस्तू वापरणे वा विकत घेणे म्हणजे शत्रूराष्ट्राला मजबूत करण्यासारखेच असल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन येथील विविध हिंदुप्रेमी संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. या वेळी चिनी उत्पादनांची होळी करून चीनचा तीव्र निषेध करण्यात आला.

साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍यांची चौकशी व्हावी, अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना पोसणार्‍यांची चौकशी करावी या मागण्यांसाठीही येथे आंदोलन करण्यात आले. यात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीशिवप्रतिष्ठान, बजरंग व्यायाम शाळा, योग वेदांत सेवा समिती या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

१. दिलीप ढाकणे पाटील, श्रीशिवप्रतिष्ठान  हिंदुस्थान

चिनी ड्रॅगनला युद्धाविना पराजित करायचे असेल, तर राष्ट्रभावना एक करून स्वदेशी वस्तू वापराचा मार्ग अवलंबणे आणि चीनची आर्थिक कोंडी करणे हाच प्रभावी उपाय होऊ शकतो !

२. प्रा. डॉ. सतीश बागुल

अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमण म्हणजे देशभरातील हिंदूंच्या अस्मितेवरील आक्रमण आहे. भारतवासियांच्या आत्मसन्मानाचा भाग म्हणून केंद्रसरकारने तातडीने या आतंकवादाला पोसणार्‍या राजकीय शक्तींना उघड करावे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी !

हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनीही त्यांचे विचार मांडले.

वृक्षप्रेमी सर्वश्री विठ्ठल मगरे, नरेंद्र तांबोळी, हर्षद पत्की, ललित विसपुते, आनंद मराठे आणि अन्य पदाधिकार्‍यांनी, तसेच सौ. छाया सोनार, आकाश गावित, मयूर चौधरी आदींसह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग घेतला.

क्षणचित्रे

१. भर पावसात साधकांनी आंदोलनाची सिद्धता केली. जागेची शुद्धी करून प्रार्थना केल्यावर पाऊस लगेच थांबला. आंदोलनानंतर कृतज्ञता व्यक्त झाल्यावरच पाऊस चालू झाला.

२. रस्त्यावरून जाणार्‍या एका राष्ट्रप्रेमी गृहस्थाने आंदोलनाचा उद्देश समजून घेतला आणि घरी जाऊन पत्नी आणि मुलगा यांनाही आंदोलनस्थळी घेऊन आले.

३. होळी पेटवण्यासाठी एका रिक्शाचालकाने स्वतःहून काडीपेटी आणून दिली. ४. चौकात उभे असलेलेे लोक स्वतःहून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment