रामनाथी (गोवा) : पुणे येथील पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक श्री. मिलिंद शेटे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह पाक्षिक सांस्कृतिक वार्ताच्या व्यवस्थापिका सौ. सुनिता पेंढारकर आणि कर्मचारी होते. या वेळी सनातनचे साधक श्री. प्रशांत कोयंडे यांनी त्यांना आश्रमात चालणाऱ्यां राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. आश्रमदर्शनानंतर त्यांनी पुढील अभिप्राय व्यक्त केले.
१. श्री. मिलिंद भालचंद्र शेटे, संपादक, पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्र : फार चांगले वाटले. आश्रमात सात्त्विक वातावरण असल्याचे जाणवले. विशेषतः ध्यानमंदिरात अधिक सात्त्विकता जाणवली.
२. सौ. सुनिता पेंढारकर, व्यवस्थापिका, पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्र : आश्रम अतिशय छान वाटला आणि एक आध्यात्मिक चैतन्य जाणवले. आश्रमातील वातावरण प्रसन्न आहे.
३. सौ. अनुराधा देशपांडे, कर्मचारी, पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्र : आध्यात्मिक, तसेच मानसिक प्रगती नक्कीच होईल, असेच वातावरण आश्रमात दिसून आले.
४. सौ. निर्मला शाम दीक्षित, कर्मचारी, पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्र : खूपच छान ! आश्रमात प्रवेश करतांना श्रीकृष्णाच्या चित्रातील प्रसन्नता, चैतन्य आणि कधीही येणाऱ्यां संकटांचा सामना करण्यासाठी सुदर्शनचक्र हाती घेऊन असलेली सज्जता एक शक्ती देते, असे वाटले. आश्रमात सर्वत्र शांतता आणि स्वच्छता आहे. सूक्ष्म जगताची माहिती छान मिळाली. याची प्रेरणा अध्यात्मातून प्राप्त करून घेता येते. भक्ती आणि श्रद्धा यांतून देवतांची शक्ती अन् आशीर्वाद मिळतात, हे लक्षात आले.
५. श्री. आकाश जाधव, कर्मचारी, पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्र : पुष्कळ चांगले वाटले आणि आश्रमातील वातावरण पाहून मन भारावून गेले. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून चांगले वाटले.